चालू घडामोडी | 15 फेब्रुवारी 2021

 • दरवर्षी 15 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन (International Childhood Cancer Day) म्हणून साजरा केला जातो.
 • कर्नाटक सरकार शिवमोगा येथे पहिले सेंद्रिय शेती विद्यापीठाची स्थापना करणार आहे.
 • राजस्थान या राज्य सरकारने भिकार्‍यांचे पुनर्वसन करून राज्याला ‘भिकारीमुक्त’ करण्याची मोहीम सुरू केली आहे.
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि मॅप माय इंडिया या कंपनीने गूगल मॅपला एक स्वदेशी पर्याय तयार करण्यासाठी स्थळ-आधारित सॉफ्टवेअर सेवा आणि AI तंत्रावर आधारित उपाय विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
 • केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाने 20 फेब्रुवारी 2021 रोजी नवी दिल्लीत “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेखाली “मुशायरा” (काव्यप्रकार) हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 • केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 यानुसार, जल जीवन अभियान (ग्रामीण) याच्या धर्तीवर 2.87 लक्ष कोटी रुपयांच्या खर्चासह पाच वर्षांत राबविण्यात येणारी योजना – जल जीवन अभियान (शहरी).
 • जिल्हा पातळीवर कौशल्य प्रशिक्षणाला बळकटी प्रदान करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने ‘संकल्प’ / SANKALP (कौशल्य संपादन व उपजीविकेच्या साधनांच्या वाढीसाठी माहितीपर जागृती) कार्यक्रमाच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन (MGNF) योजनेचा प्रारंभ केला.
 • DRDOच्या कॉम्बॅट व्हेइकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ईस्टेब्लिशमेन्ट या संस्थेने विकसित केलेला अत्याधुनिक रणगाडा – अर्जुन मेन बॅटल टँक (MK-1A).
 • डाळीचा जगातला सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक – भारत (240 लक्ष टनांपेक्षा जास्त उत्पादन).
 • चीनच्या नॅशनल रेडिओ & टेलिव्हिजन (डमिनिस्ट्रेशन (NRTA) च्या निवेदनानुसार चीनने BBC वर्ल्ड न्यूजला देशात प्रसारित करण्यास बंदी घातली आहे.
 • नव्याने तयार झालेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) च्या पहिल्या समर्पित व्यावसायिक मिशनमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISO) महिन्याच्या शेवटी PSLV-C51 / ॲमेझोनिया -1 मिशन सुरू करणार आहे.

Leave a Comment