चालू घडामोडी | 14 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) आंतराष्ट्रीय पातळीवर १४ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

2) लिलावाच्या सिद्धांतातल्या सुधारणा आणि लिलावाच्या नव्या स्वरुपाच्या शोधासाठी पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन या अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी लिलावाच्या पद्धतींचा अभ्यास केला आणि लिलावाच्या नव्या पद्धतीची मांडणी केली.

3) मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्र पूर्णपणे डिजिटल म्हणून घोषित केले आहे कारण केरळ हे सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे.

4) CSIR-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड-19 विषाणू चाचणी विकसित केली आहे, ज्यासाठी रोगजनक शोधण्यासाठी कोणत्याही महागड्या यंत्राची गरज भासत नाही. त्यांचे नाव ‘फेलुदा’ (FNCAS9 Editor-Limited Uniform Detection Assay) असे ठेवण्यात आले आहे.

5) बांगलादेशच्या मंत्रिमंडळाने बलात्काराची सर्वाधिक शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा समाविष्ट करण्याच्या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली.

6) राजमाता विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी साजरा करण्यासाठी 100 रुपयांचे स्मारक नाणे 11 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

7) “ए निगलेक्टेड ट्रॅजेडी: द ग्लोबल बर्डन ऑफ स्टिलबर्थ्स” या शीर्षकाचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF), जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग (DESA) आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष बाळांचा जन्माच्यावेळी मृत्यू होतो आणि त्यापैकी 84 टक्के अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.

आंतरमंत्रालयीन समिती अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची निवड :

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चने गठित केलेल्या प्रवासी भारतीय अकॅडमिक अँड सायंटिफिक संपर्क (प्रभास) या आंतरमंत्रालयीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून माजी परराष्ट्र सचिव तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विदेशातील भारतीयांचा आत्मनिर्भर भारतासाठी जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. उच्चाधिकार समितीत विविध मंत्रालयांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. माझ्या परराष्ट्र सेवेतील अनुभवांचा देशासाठी उपयोग करण्याचे प्रयत्न राहतील, असे ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेत १०.३ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज :

भारताची अर्थव्यवस्था १०.३ टक्क्यांनी घसरणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे. करोना व्हायरस आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाउन याचा गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा दर १०.३ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जगाच्या अर्थव्यवस्थेत ४.४ टक्क्यांनी घट होईल. मात्र २०२१ मध्ये हे चित्र बदलेल असंही IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे. आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने जगातल्या अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये हे सगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. हा अहवाल वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सादर केला आहे.

२०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल आणि २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांनी वधारेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ५.८ टक्के घसरण होईल असाही अंदाज आहे. तर २०२१ मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ३.९ टक्के वधारेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment