चालू घडामोडी | 14 मार्च 2021

MPSC Current Affairs | 14 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


  • पाय (π) दिन – 14 मार्च.
  • प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष २०२० साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार (साहित्य अकादमी पुरस्कार 2020) जाहीर झाला.
  • ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले.
  • न्यूट्रल विंड आणि प्लाझ्मा डायनॅमिक या विषयामधील दृष्टिकोनातील भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 12 मार्च 2021 रोजी श्रीहरिकोटा येथून ‘साऊंडिंग अग्निबाण (RH-560)’ प्रक्षेपित केला.
  • ISRO संस्थेने ‘रोहिणी’ मालिका नावाने साऊंडिंग अग्निबाणाची एक मालिका विकसित केली आहे, ज्याचा उपयोग पृथ्वीच्या वरील आवरणातील वातावरणीय क्षेत्राच्या तपासणीसाठी आणि अंतराळ संशोधनासाठी केला जातो.
  • आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली.
  • जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत देशात ‘ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन’ याची स्थापना करण्याची घोषणा केली.
  • BRICS चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BRICS CCI) याच्या महिलांच्या शाखेने 12 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे “महिलांसाठी आत्मनिर्भर भारत” विषयक शिखर परिषदेचे आयोजन केले.

दुस्तलिक-2 : भारत व उझबेकिस्तान युद्ध सराव

अलीकडेच उत्तराखंडमधील चौबटिया येथे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यादरम्यान दुस्तलिक या युद्ध सरावाच्या (DUSTLIK  II) दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात झाली.

या दोन्ही देशांमध्ये प्रत्येक 2 वर्षांनी आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे . याचे समापन 19 मार्च रोजी होईल.

या सरावाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे आयोजित करण्यात आली होती.

या वर्षाच्या या आवृत्तीत भारत आणि उझबेकिस्तानचे सुमारे ४५-४५ सैनिक सहभागी होणार आहेत. या सरावामध्ये दोन्ही देशांचे सैनिक डोंगराळ, ग्रामीण आणि शहरी भागातील बंडखोरीविरोधी व दहशतवादविरोधी कारवाई संबंधी आपली कौशल्ये व विशेष ज्ञान सामाईक करतील.

या संयुक्त युद्ध सरावामुळे दोन्ही देशांचे लष्करी व मुत्सद्दी संबंध आणखी दृढ होतील. तसेच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांचा दृढ संकल्पही यातून दिसून येतो. मध्य आशियाई प्रदेशांशी संपर्क आणि सुरक्षेच्या दृष्टीने उझबेकिस्तान भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.

राष्ट्रीय रेल्वे योजना:

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 10 मार्च 2021 रोजी घोषणा केली की भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत भविष्यासाठी तयार रेल्वे प्रणाली स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे योजना (NRP) तयार केली आहे.

ही राष्ट्रीय रेल्वे योजना परिचालन क्षमता व व्यावसायिक धोरण अशा दोन्ही उपक्रमांवर आधारित रणनीती तयार करण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहे. मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रेल्वेमंत्री लोकसभेत लेखी उत्तरात म्हणाले की, शहरी वाहतूक ही शहरी विकासाचा अविभाज्य भाग आहे आणि हा राज्याचा विषय आहे. म्हणूनच मेट्रोरेल प्रकल्प किंवा मेट्रोलाईट किंवा मेट्रोनेट सारख्या शहरी वाहतुकीची पायाभूत सुविधा किंवा मेट्रो पायाभूत सुविधा सुरू करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी संबंधित राज्य जबाबदार आहे.

श्रीलंकेत लवकरच बुरखा घालण्यावर बंदी येणार:

श्रीलंकेमध्ये लवकरच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. श्रीलंकेचे जनसुरक्षा मंत्री (Public Security Minister) सरथ वीरसेखरा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

यासंदर्भात आपण कागदपत्रांवर सही केली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ते पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यासोबतच श्रीलंकेमधील १ हजारहून जास्त मदरशांवर बंदी घालण्याचा देखील निर्णय सरकारने घेतल्याचं वीरसेखरा यांनी जाहीर केलं आहे. श्रीलंकेमधील अल्पसंख्याकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment