चालू घडामोडी | 14 जून 2020

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’ :

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विविध सार्वजनिक क्षेत्रातल्या विज्ञान दळणवळण संस्था आणि शाखांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’ स्थापन केला आहे.

मुख्य बाबी : हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक पातळीवर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो.

विज्ञान व तंत्रज्ञान व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, संस्कृती, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा आणि माहिती व प्रसारण यासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व येथे आहे.

हा मंच देशातील मॅक्रो (वृहत) आणि सूक्ष्म दोन्ही स्तरावर विज्ञान दळणवळण कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कार्य करणार, ज्यामुळे विज्ञानाबद्दल जनजागृती वाढणार आणि मोठ्या प्रमाणात विज्ञानात रस निर्माण होण्यात मदत होणार आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण (NCSTC) सचिवालय मंचाला सहकार्य देणार आहे. NCSTC देशातल्या विविध संस्था, कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.

भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार :

भारत आणि जपान सध्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भविष्यात हे दोन्ही देश चंद्र मोहिमेसाठी एकत्र येणार आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चंद्रयान मोहिमेची योजना आखली आहे. तर या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

मागच्यावर्षी चांद्रयान-2 मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे. तसेच भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम 2023 नंतर पार पडणार आहे.

भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. 2022 मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. तसेच लँडिंग मॉडयुल आणि रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच 3 रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.

क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं निधन :

भारताचे सर्वात वयस्कर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं शनिवार सकाळी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. तर 1940 च्या दशकात ते एकूण 9 रणजी सामने खेळले होते.

तसंच त्यांनी 9 रणजी सामन्यांमध्ये एकूण 277 धावा केल्या. तसेच किक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन केलं. व्यवसायानं ते चार्टर्ड अकाऊंटंट होते.

‘आरोग्यपथ’: आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेत उपलब्धतेसाठी संकेतस्थळ

आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) ‘आरोग्यपथ’ या नावाने एक राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी संकेतस्थळ कार्यरत केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे व्यासपीठ सेवा पुरविणार.

कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तिथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून “आरोग्यपथ” नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले आहे.

ठळक बाबी : महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.

या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते.

Leave a Reply