चालू घडामोडी | 14 जुलै 2020

जगातील कर्ज होईल जीडीपीच्या दुप्पट, नाणेनिधीचा इशारा :

जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला असून, सन २०२०-२१ मध्ये जगभरातील अर्थव्यवस्थांच्या जीडीपीच्या दुप्पट कर्जाचा बोजा वाढण्याची भीती आहे.

त्याचप्रमाणे जीडीपी १४ टक्के घटून सर्वच देशांच्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, असा इशारा आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या एका अधिकाऱ्याने दिला आहे. नाणेनिधीच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संचालक व्हिटर गास्पर यांनी हा इशारा देतानाच सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना महसुलातील तुटीचा प्रश्न भेडसावणार असल्याचे सांगितले.

यामुळे सर्वच सरकारांना अधिक प्रमाणात कर्ज घ्यावे लागणार असून, अर्थसंकल्पातील तूट मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षापेक्षा जागतिक पातळीवरील सार्वजनिक कर्ज सुमारे २० टक्क्यांनी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, जपान, युरोपियन देश यांच्यावरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढू शकेल.

NTPC कंपनीने ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला :

NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) या सार्वजनिक कंपनीने प्रतिष्ठित ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला आहे. कॉर्पोरेट उत्कृष्टता श्रेणीत उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार’ हा शाश्वत उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रदान केला जातो. देशातील शाश्वतता ओळखण्यासाठी हे सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ मानले जाते.

  • ठळक बाबी : NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि भारतातली सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे.
  • NTPC कंपनीचा पथदर्शी CSR कार्यक्रम असलेला GEM (मुलगी सशक्तीकरण अभियान) हा वंचित वर्गातील शालेय मुलींच्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी चालत आहे, ज्याच्या अंतर्गत वीज केंद्र परिसरात चार आठवड्यांचा निवासी कार्यक्रम आयोजित केला जातो.
  • NTPCने कंत्राटदारांची कामगार माहिती व्यवस्थापन प्रणाली (CLIMS) देखील अंमलात आणली असून त्याद्वारे कंत्राटी मजुरांना महिना अखेरीस प्रकल्प सुरु असलेल्या ठिकाणीच वेतन दिले जाते.
  • NTPCची एकूण स्थापित क्षमता 62110 मेगावॅट असून NTPC समूहाकडे 24 कोळसा ऊर्जा केंद्रांसह 70 ऊर्जा केंद्र, 7 एकात्मिक नैसर्गिक वायू / द्रव इंधन, 1 जलविद्युत, 13 नवीकरणीय व 25 सहाय्यक आणि संयुक्त उपक्रम ऊर्जा केंद्र आहेत.

संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी INST संस्थेच्या वैज्ञानिकांनी अतिसूक्ष्म कण तयार केले :

मोहाली (पंजाब) येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) वैज्ञानिकांनी चिटोसनसह अतिसूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आणि संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी या कणाला झिंक ग्लुकोनेटसहीत भारित केले.

ग्लोबल विक 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Global Week 2020 मध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी भारतात येण्यास अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले. आत्मनिर्भर भारत म्हणजे जगाशी नाते तोडणारा भारत किंवा संकुचित भारत नव्हे. तर स्वशाश्वत आणि स्वनिर्मितीक्षम आहे असाही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment