चालू घडामोडी | 14 फेब्रुवारी 2021

  • केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्रालयाच्यावतीने पश्चिम बंगाल राज्यात अकराव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ते 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंतच्या कालावधीत _____ येथे होणार आहे – कूच बेहर, दार्जीलिंग आणि मुर्शिदाबाद.
  • ‘पृथ्वी निरीक्षण आधारित माहितीचा वापर करून प्रभावी पूर अंदाज’ विषयक सहयोगी प्रकल्पांसाठी ____ केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ब्रिटनच्या यूके स्पेस एजन्सी या संस्थेच्या नॅशनल स्पेस इनोव्हेशन प्रोग्राम (NSIP) सोबत करार केला – जम्मू व काश्मिर
  • _______ राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘ई-रेशन कार्ड’ योजनेचे वितरण सुरू झाले आहे – केरळ.
  • राज्यात शाश्वत विकास उद्दीष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय आर्थिक व्यापार संघटना (IETO) आणि _______ सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला – कर्नाटक.
  • विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ (SERB) यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2021’चे विजेता – डॉ. शोभना कपूर, डॉ. अंतरा बॅनर्जी, डॉ. सोनू गांधी आणि डॉ. रितु गुप्ता.
  • मणीपूर उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश – श्री न्यायमूर्ती पुलिगोरू वेंकट संजय कुमार.
  • कार्यकाळ पूर्ण झालेल्या गाम्बियाच्या फातौ बेनसौडा यांच्या जागी निवड झालेले, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (ICC) नवे मुख्य अभियोक्ता – करीम खान (ब्रिटनचे वकील).
  • इटालीचा प्रतिष्ठित ‘जॉन फ्लोरिओ पुरस्कार 2020’ जिंकणारे भारतीय मूळ असलेले लेखक – झुम्पा लाहिरी.
  • इटली देशाचे नवीन पंतप्रधान – मारिओ द्रागी.
  • या देशाच्या मुख्य रोखे नियमन संस्थेने जगातील प्रथम बिटकॉइन एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) सादर करण्यास मान्यता दिली – कॅनडा.

Leave a Comment