चालू घडामोडी | 13 सप्टेंबर 2020

आता बँकांमध्ये Chief Compliance Officer ची नियुक्ती होणार :

बँकिंग क्षेत्रात अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापन कल्चरमध्ये एकरूपता आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकारी (CCO- Chief Compliance Officer) नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सीसीओला किमान तीन वर्षांसाठी महाव्यवस्थापक (General Manager) रँकच्या पदावर नियुक्त करावे लागेल. जरी हे पद महाव्यवस्थापक पदाच्या रँकचे नसले तरी ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या 2 रँकपेक्षा कमी दर्जाचे नसावे, असे या संदर्भातील आरबीआयच्या परिपत्रकानुसार म्हटले आहे. तसेच, स्वतंत्र अनुपालन प्रक्रिया सीसीओच्या अंतर्गतच पूर्ण करावी लागेल, ज्यांची निवड योग्य प्रक्रियेअंतर्गत होईल.

बँकेत अनुपालन जोखीम अचूकपणे करता यावे, यासाठी फिट आणि योग्य मूल्यांकनाच्या आधारे नियुक्ती जाईल. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, बँकांचे पालन त्यांच्या स्वत: च्या अनुसार केले जाते. परंतु त्यात नवीन एकरूपता सुनिश्चित करण्यात येईल.

टपाल विभागाची ‘पंचतारांकित गावे’ योजना :

10 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय टपाल विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले. टपाल विभागाच्या योजना देशातल्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात हा या योजनेचा हेतु आहे.

प्रारंभी, महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. खेड्यातल्या प्रत्येक घरात टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे.

कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.

Leave a Reply