चालू घडामोडी | 13 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) भारतीय रत्न व दागदागिने निर्यात परिषद (GJEPC) यांच्यावतीने पहिली आभासी ‘भारत आंतरराष्ट्रीय दागदागिने प्रदर्शनी’चे आयोजन करण्यात आले.

2) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमा रस्ता संघटना (BRO) ने बांधलेल्या 44 पुलांचे उद्घाटन केले आणि अरुणाचल प्रदेशमध्ये नेचिफू बोगद्याचा पायाभरणी केली.

3) ‘फ्रेंच ओपन 2020 (टेनिस)’ स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या शेवटच्या सामन्यात राफेल नदालने नोवाक जोकोविचवर मात केली. नदालने फ्रेंच ओपनमधला 100 वा विजय साजरा करीत फ्रेंच ओपनचे 13 वे जेतेपद पटकावले. क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या फ्रेंच ओपनच्या 13 व्या विजेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली आहे.

4) विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटच्या ऑपरेशनल सायकलच्या यशस्वी कळसाच्या निमित्ताने फ्लीट अवॉर्ड फंक्शन (FAF), 2020 आयोजित करण्यात आले होते.

5) ‘राष्ट्रीय फुलपाखर’ची निवड करण्यासाठीची निवडणूक झाली असून, त्यात सुमारे 60 हजार नागरिकांनी आवडीच्या फुलपाखराला मतदान केले आहे. इंडियन जझेबेल, फाइव्ह बार स्वॉर्डटेल, कृष्णा पिकॉक, यलो जॉरजोन, ऑरेंज ओकलिफ, नॉर्थन जंगलक्वीन आणि इंडियन नवाब असे सात उमेदवार आहेत. कृष्णा पिकॉक, इंडियन जझेबेल आणि ऑरेंज ओकलिफ या जातींना सर्वाधिक मते पडली.

6) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि KPIT लिमिटेड यांनी ‘10 kWe ऑटोमोटिव्ह ग्रेड LT-PEMFC फ्युएल सेल’ तंत्रज्ञान विकसित केले आणि त्याद्वारे पुण्यात भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाडीची यशस्वी चाचणी घेतली.

7) पुडुचेरी विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 100 टक्के सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ ठरले आहे.

2020चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर :

गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, सन २०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला आहे.

मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे. हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे.

या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

जगभरात भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाणार :

भारतीय कापसासाठी प्रथमच ब्रँड आणि बोधचिन्हाचे अनावरण केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाणार.

कस्तुरी कापूस शुभ्रपणा, चमक, मुलायमपणा, शुद्धता, वेगळेपणा आणि भारतीयतेसाठी ओळखला जातो.

इतर ठळक बाबी

  • कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे 6 दशलक्ष शेतकऱ्यांना उपजीविका प्राप्त करुन देते.
  • भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जगातला सर्वांत मोठा कापसाचा ग्राहक आहे.
  • जागतिक कापसापैकी 23 टक्के कापसाचे उत्पादन भारतात होते. तर, जगाच्या सेंद्रीय कापसापैकी 51 टक्के उत्पादन भारतात होते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (CCI) शेतकऱ्यांना कापसासाठी आत्तापर्यंतची सर्वाधिक किमान आधारभूत किंमत दिली आहे.
  • CCIने 430 कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत आणि शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने 72 तासांत पैसे दिले जातात.
  • ”कॉट-अॅली” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पीक परिस्थिती आणि उत्तम शेतीविषयीची माहिती दिली जाते. MSME सूतगिरण्या, खादी आणि ग्रामोद्योग, सहकारी सूतगिरण्या यासाठी प्रति कँडी 300 रुपये सूट दिली जाते.

Leave a Comment