चालू घडामोडी | 13 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रात उत्पादन-जोडलेल्या प्रोत्साहन योजना (PLI) सुरू करण्यास मान्यता दिली.

2) लेहमध्ये लडाख केंद्र शासित प्रदेशस्तरीय बँकर्स समितीची दुसरी बैठक झाली.

3) संजय मल्होत्रा यांनी आरईसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला.

4) चीन देशाने तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी अंतराळात “जगातला पहिला 6G उपग्रह” यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.

5) झारखंड राज्याच्या विधानसभेनी एक ठराव एकमताने मंजूर केला, ज्यामध्ये जनगणना नोंदणी यादीमध्ये समावेश करण्यासाठी एक स्वतंत्र आदिवासी / सरना धार्मिक संहितेची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.

6) हरियाणा राज्य विधानसभेने पंचायत सदस्यांचे रिकॉल विधेयक मंजूर केले. हरियाणा पंचायती राज (दुसरी दुरुस्ती) विधेयक, 2020 उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी मांडले.

7) चीनमध्ये खेळविण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) महिला विश्व चषक 2020’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन मेंग हिने सन यिंग्शा हिच्याविरुध्द विजय मिळवला.

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी :

जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण ६ पुरस्कार पटकाविले आहेत. सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला.

याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९’ चे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा सलग दुसºयांदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी पुरस्कार स्वीकारला.

नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण ६ विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हयाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसºया क्रमांकांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

भारत फिलिपिन्स देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र :

‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो.

पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो. हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.

‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे.

  • हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
  • ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.
  • या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.

Leave a Comment