चालू घडामोडी | 13 मार्च 2021

MPSC Current Affairs | 13 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • भारताचे पहिले साखर संग्रहालय – पुणे, महाराष्ट्र.
 • भारताचे पहिले वन उपचार केंद्र – रानीखेत (कालिका, उत्तराखंड).
 • केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कार्य राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची टेरिटोरियल आर्मी दलात कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. 124 इन्फंट्री बटालियन टेरिटोरियल आर्मी (शीख) येथे ते कॅप्टन पदावर असणार. ते अशी पदोन्नती मिळविणारे सेवेत असलेले पहिले खासदार ठरले.
 • कोविड-19 महामारीच्या काळात, भारताच्या कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीची क्षमता उंचावण्यासाठी, कृषी व अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) पहिल्यांदाच आपला पहिला आभासी व्यापार मेळावा 10 मार्च 2021 ते 12 मार्च 2021 या कालावधीत आयोजित केला. ‘इंडिया राईस अँड अ‍ॅग्रो कमोडिटी’ ही मेळाव्याची संकल्पना होती.
 • राइकेन आणि फुजीत्सू या जपानी वैज्ञानिक संशोधन संस्थांनी “फुगाकू” नामक जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक विकसित केला आहे.
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि _____ या संस्थांनी उपग्रहापासून मिळालेल्या माहितीचा वापर करून तांदूळ पिकाचे क्षेत्र आणि हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठीच्या उपक्रमांसाठी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला – जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA).
 • दुबईचा पहिला क्षेत्रीय पर्यावरणविषयक नॅनोमेट्रिक उपग्रह – डीएमसॅट-1 उपग्रह.
 • ओडिशामध्ये बंदर सुविधा सुरू करण्याच्या _____ सरकारच्या प्रस्तावाला ओडिशा सरकारने स्वीकारले आहे – बिहार.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व स्वरूपात 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू – मिताली राज.
 • ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यासाठी, प्रख्यात सागरी कासव तज्ञ सी. एस. कार यांच्या नावावरून नाव ठेवण्यात आलेले भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाचे (ZSI) सागरी कासव संशोधन केंद्र _____ येथे उघडण्यात आले – गोपाळपूर (गंजम जिल्हा, ओडिशा).
 • आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक ___ देशाच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली – भारत.
 • BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाची 2021 या वर्षासाठी संकल्पना – [email protected]: BRICS देशांदरम्यान अखंडता, दृढता आणि सर्वसहमती यासाठी सहकार्य”.
 • ‘दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ (SAARC) शिखर परिषद 2021’ याचे आयोजन करणारा देश – पाकिस्तान.
 • या देशात इस्लामिक सहकार्य संघटनेमधील (OIC) ऑर्गनायझेशन फॉर वुमन डेव्हलपमेंट (OWD) याच्या मुख्यालयाची स्थापना केली जाणार – इजिप्त.

Leave a Comment