चालू घडामोडी | 13 जून 2020

0

दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून भारतीय रेल्वेने निर्माण केला नवा जागतिक आदर्श :

भारतीय रेल्वेनी पहिल्यांदाच कॉन्टॅक्ट वायरची 7.57 मीटर इतकी जास्त उंची असलेले ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतीकृत सेक्शनमध्ये दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे. या परिचालनाची यशस्वी सुरुवात 10 जून 2020 रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोताड स्थानकांपासून झाली.

ठळक बाबी : संपूर्ण जगात अभूतपूर्व अशी पहिलीच कामगिरी आहे आणि त्यामुळे भारतीय रेल्वेचा नवा हरित उपक्रम म्हणून ‘हरित भारत’ मोहीमेला देखील चालना मिळणार आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय रेल्वेनी जास्त उंचीच्या OHE सेक्शनमध्ये जास्त उंचीवर पोहोचू शकणाऱ्या पेंटोग्राफच्या साहाय्याने दोन थरांची मालवाहू रेलगाडी चालवणारी पहिली रेल्वे बनण्याचा बहुमान मिळवला आहे. वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी वेळेत, कमी खर्चात अधिकाधिक पुरवठा करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरते.

एप्रिल: ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत २०.४ टक्क्यांची घसरण

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत एप्रिलमध्ये २०.४ टक्के मोठी घसरण आली. कोरोना विषाणूमुळे देशात लागू टाळेबंदीचा हा पहिला महिना होता. ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया(ओएनएस)ने शुक्रवारी फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतच्या तीन महिन्यांची आकडेवारी जारी केली.

अर्थव्यवस्थेतील ही घसरण २००८-०९ च्या मंदीपेक्षा तिप्पट जास्त आहे. फेब्रुवारी एप्रिल तिमाहीत गेल्या वर्षी समान अवधीच्या तुलनेत १० टक्के घसरण आली आहे. तज्ञांनुसार एप्रिल सर्वात वाईट महिना राहिला.

विश्व खाद्य पुरस्कार डॉ. रतन लाल यांना :

भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा वैज्ञानिक डॉ. रतन लाल (७५) यांना सन २०२०चा प्रतिष्ठित विश्व खाद्य पुरस्कार जाहीर झाला आहे. छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या मातीची गुणवत्ता सुधारण्यात मदत करून जागतिक अन्नपुरवठा वाढविण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल डॉ. लाल यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असलेला विश्व खाद्य पुरस्कार आयोवा येथील विश्व खाद्य पुरस्कार फाऊंडेशनतर्फे दिला जातो. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी डॉ. रतन लाल यांच्या नावाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. दोन लाख ५० हजार अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

५० हून अधिक वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत डॉ. लाल यांनी मातीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे चार खंडांमधील ५० कोटींहून अधिक छोट्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले. तसेच त्यांच्या या कार्यामुळे दोन अब्जहून अधिक लोकांच्या खाद्यान्न आणि पोषण सुरक्षेमध्येही सुधारणा झाली आहे.

शिवाय नैसर्गिक उष्णकटिबंधीय परिसंस्थेतील कोट्यवधी हेक्टर जमीन वाचविली, या शब्दांत फाऊंडेशनने डॉ. लाल यांचे कौतुक केले आहे.

“आय फ्लोज – मुंबई”: मुंबईसाठी पूर इशारा प्रणाली

“आय फ्लोज – मुंबई (IFLOWS-MUMBAI)” ही एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळासंबधी इशारा मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.

पुराची पूर्वतयारी म्हणून लोकांना आधीच सतर्क केले जावे, जेणेकरून ते पूर येण्यापुर्वीच त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असावे या हेतूने ही यंत्रणा महत्त्वाची ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here