चालू घडामोडी | 13 जुलै 2020

0

विद्यार्थ्यांसाठी अटल इनोव्हेशन मिशनचे ‘ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या आवाहनाच्या अनुषंगाने भारतीय मोबाइल ॲप नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने (AIM) देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अटल टिंकरींग लॅब (ATL) ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ सादर केले आहे.

‘ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम असून पूर्णपणे मोफत आहे. 6 प्रकल्प-आधारित शैक्षणिक सामग्री पद्धती आणि ऑनलाईन मार्गदर्शक सत्राद्वारे तरुण नवनिर्माते विविध भारतीय भाषांमध्ये मोबाइल अॅप तयार करण्याचे शिकू शकतात आणि त्यांचे कौशल्य दाखवू शकतात.

याव्यतिरिक्त, शालेय शिक्षकांमध्ये ॲप विकासासाठी क्षमता आणि कौशल्य तयार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशनच्या ॲप डेव्हलपमेंट अभ्यासक्रमात ठराविक कालांतराने शिक्षक प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाणार आहेत. अटल इनोव्हेशन मिशनच्या महत्वाकांक्षी अटल टिंकरींग लॅब उपक्रमाच्या अंतर्गत भविष्यात शालेय विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढविण्याबरोबरच त्यांना ॲप वापरकर्त्यांकडून ॲप निर्माते बनविण्याचे उद्दीष्ट ठेवून प्लेझ्मो या भारतीय स्टार्टअप कंपनीच्या सहकार्याने ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत अटल इनोव्हेशन मिशनद्वारे देशभरातल्या 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5100 पेक्षा अधिक अटल लॅब सुरू आहेत आणि दोन दशलक्षाहूनही अधिक विद्यार्थ्यांना टिंकरिंग लॅबमध्ये प्रवेश आहे

फॉक्सकॉनची भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना :

आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अॅजपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे. अॅशपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे.

चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे. भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अॅरपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.

केवळ शेतीचा अर्थव्यवस्थेला आधार :

सध्याच्या परिस्थितीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. या वर्षात केवळ शेती क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे, असे या उद्योजकांच्या संघटनेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावा याकरिता फिक्की या संस्थेने अर्थतज्ञ, उद्योजक, बॅंकर इत्यादींशी चर्चा केली. यावेळी असे सांगण्यात आले की, यावर्षी विकास दर उणे 4.5% इतका कमी होऊ शकतो. करोनाचा संसर्ग ग्रामीण भागात कमी झाला आहे. पाऊस चांगला पडत आहे.

त्यामुळे यावर्षी शेती क्षेत्राची उत्पादकता मात्र कमाल पातळीवर राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे विविध कंपन्यांनी ग्रामीण भागाचा विचार करून पुढील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्र मोठ्या शहरात एकवटले आहे. मोठ्या शहरात संसर्गाचा जास्त परिणाम झाला आहे.

त्यामुळे मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता यावर्षी 11.4 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. सेवा क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.8 टक्‍के राहील. बहुतांश कंपन्यांचे उत्पादन त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी होत आहे. कंपन्या नवी गुंतवणूक करण्याची शक्‍यता कमी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त सरकार आपला खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. सरकारने छोटे उद्योग आणि ग्रामीण रोजगारवाढीसाठी प्रयत्न केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here