चालू घडामोडी | 13 फेब्रुवारी 2021

 • राष्ट्रीय महिला दिन – 13 फेब्रुवारी.
 • 2021 साली जागतिक रेडिओ दिनाची (13 फेब्रुवारी) संकल्पना – “न्यू वर्ल्ड, न्यू रेडिओ”.
 • महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2021’चा विजेता – रंगनाथ पठारे (मराठी लेखक).
 • महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या ‘श्री पु. भागवत पुरस्कार 2021’चा प्राप्तकर्ता – शब्दालय पब्लिकेशन, अहमदनगर.
 • केंद्रीय सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाद्वारे (NBB) राबवण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारतचा एक भाग म्हणून जाहीर केलेल्या _____ योजनेला तीन वर्षांसाठी (2020-21 ते 2022-23) 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत – राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजना.
 • 11 फेब्रुवारी 2021 रोजी, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय युनानी औषध संशोधन केंद्र (CCRUM) यांच्यावतीने ______ या विषयाखाली ‘युनानी दिन 2021’ आणि युनानी औषध विषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले – “युनानी औषध: कोविड-19 च्या काळातील संधी आणि आव्हाने”.
 • 11 फेब्रुवारी 2021 रोजी _____ कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला, ज्याअंतर्गत विज्ञानात रुची वाढवण्यासाठी मुलीना प्रोत्साहन आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या विषयांमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी 50 जिल्ह्यात वाढवली जाणार आहे जो सध्या 50 जिल्ह्यात आधीच राबवला जात आहे – विज्ञान ज्योती कार्यक्रम (विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेला).
 • अंतराळ विभाग आणि नवी दिल्लीतल्या ____ कंपनीने स्थळ-आधारित सॉफ्टवेअर सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला – CE इन्फो सिस्टम प्राइवेट लिमिटेड (एक भारतीय भू-स्थानिक तंत्रज्ञान कंपनी).
 • 2 ते 4 मार्च 2021 या कालावधीत आभासी माध्यमातून होणाऱ्या द्वितीय “मेरीटाईम इंडिया समिट-2021” या कार्यक्रमाचा आयोजक – बंदर, नौवहन व जलवाहतूक मंत्रालय.
 • कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय वकील परिषद (BCI) _____ येथे भारतीय विधी संस्था (IIL) याची स्थापना करणार आहे – भुवनेश्वर.
 • ______ आणि ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) या संस्थांनी ‘इंडिया-ऑस्ट्रेलिया सर्कूलर इकॉनमी (I-ACE) हॅकाथॉन, 2021” हा कार्यक्रम आयोजित केला – भारताचे अटल इनोव्हेशन मिशन (AIM).
 • 93 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत शीर्ष 10 चित्रपटांत सूचीबद्ध करण्यात आलेला भारतीय लघुपट – ‘बिट्टू’.

Leave a Comment