चालू घडामोडी | 13 ऑगस्ट 2020

AIM आणि डेल टेक्नॉलॉजीज यांचा “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” :

अटल टिंकरिंग लॅबच्या (ATL) तरूण संशोधकांसाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग यांनी डेल टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या सहकार्याने 11 ऑगस्ट 2020 रोजी “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” (SEP 2.0) याचा शुभारंभ केला.

SEP 1.0 कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर, लगेचच याच्या दुसऱ्या भागाचा प्रारंभ करण्यात आला. SEP 2.0 कार्यक्रमामुळे विद्यार्थी संशोधकांना डेल कंपनीच्या प्रतिनिधींच्या सोबतीने काम करण्याची संधी मिळणार आहे.

त्यांना मार्गदर्शकांचा पाठिंबा मिळणार, नमुना व तपासणीसाठी प्रोत्साहन आणि अंतिम वापरकर्त्याकडून अभिप्राय, बौद्धिक संपदेची नोंदणी आणि कल्पनांचे पेटंट करून घेणे, प्रक्रिया व उत्पादने, उत्पादनासाठी प्रोत्साहन तसेच बाजारपेठेत उत्पादन सादर करताना देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे.

उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड :

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली. निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील.

शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील. अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अशांतता माजली असताना हॅरिस यांची उमेदवारी डेमोक्रॅटिक पक्षाला फायदेशीर ठरणार आहे.

बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड करून एक इतिहास घडवला आहे. हॅरिस यांचे वडील हे जमैकातील, तर आई भारतीय आहे.

“कृषी मेघ”: भारताची राष्ट्रीय कृषी संशोधन व शिक्षण प्रणाली-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते 11 ऑगस्ट 2020 रोजी क्लाऊड तंत्राच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या “कृषी मेघ” या नावाने ‘राष्ट्रीय कृषी संशोधन व शिक्षण प्रणाली-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस’ या अत्याधुनिक माहिती व्यवस्थापन सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याच्या हैदराबाद शहरातल्या नॅशनल अकॅडेमी ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट या संस्थेतल्या आपत्ती निवारण केंद्रासोबत नवी दिल्लीच्या ICAR-भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेच्या ICAR-डेटा सेंटरचे एकात्मीकरण करणार्‍या ‘कृषी मेघ’ची स्थापना करण्यात आली आहे.

याच्यामार्फत शेतकरी, संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्ते यांना ICAR संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांनी डिजिटल स्वरुपात निर्माण केलेली शेती, संशोधन, शिक्षण आणि विस्तारासंदर्भात अद्ययावत आणि नवीन माहिती उपलब्ध झाली आहे.

पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार:

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असं म्हटलं आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply