चालू घडामोडी | 12 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 10 सप्टेंबर रोजी भारत आणि जापान देशाच्या दरम्यान एक करार झाला, ज्यामार्फत त्यांच्या सैन्यदलांना रसद पुरवठ्यासाठी एकमेकांच्या तळांचा वापर करता येणार. भारतीय भुदल आणि जापानच्या सेल्फ-डिफेन्स फोर्स यांच्यात परस्पर पुरवठा व सेवांच्या संदर्भातला हा सामंजस्य करार झाला.

2) 9 सप्टेंबर 2020 रोजी बँकॉकमधून थायलँड सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आग्नेय आशियासंबंधीच्या 73 व्या सत्राचे आयोजन केले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन या सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

3) ‘जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020’ (Global Economic Freedom Index) याच्या क्रमवारीत भारत 105 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारत या यादीत 79 व्या क्रमांकावर होता. हा निर्देशांक सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी (भारत) यांच्या मदतीने कॅनडाच्या फ्रेजर इस्टीट्यूटने तयार केला.

4) 10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) याचा शुभारंभ करण्यात आला. ही देशातली मत्स्यउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चालविलेली एक महत्वाकांक्षी योजना असून आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग आहे.

5) कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते राज्यात एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवेचा आरंभ केला. ती भारताची प्रथम एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा आहे.

एबीसीच्या अध्यक्षपदी देवेंद्र दर्डा यांची निवड :

  • लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या (एबीसी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०२०-२०२१ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
  • तसेच आयटीसी लिमिटेडचे करुणेश बजाज यांचीही सर्वानुमते एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देवेंद्र दर्डा यांनी माध्यम क्षेत्राशी संबंधित इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) आणि इफ्रा ( IFRA) अशा विविध संस्थांमध्येही त्यांनी पदभार सांभाळला आहे.
  • तसेच यवतमाळमधील अनेक शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही देवेंद्र दर्डा यांच्याकडे असून पश्चिम भारत फुटबॉल असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटीमध्येही त्यांचा समावेश आहे.

टपाल विभागाची ‘पंचतारांकित गावे’ योजना :

10 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय टपाल विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले. टपाल विभागाच्या योजना देशातल्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात हा या योजनेचा हेतु आहे. प्रारंभी, महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे.

खेड्यातल्या प्रत्येक घरात टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे. कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.

CPL 2020 : त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद

कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने CPL चं विजेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने सेंट लुशिया झौक्सवर ८ गडी राखून मात केली.

महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत नाईट रायडर्सचा संघ अजिंक्य राहिला आहे. विजयासाठी मिळालेलं १५५ धावांचं आव्हान नाईट रायडर्सने लेंडल सिमन्सच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. सिमन्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Leave a Comment