चालू घडामोडी | 12 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक आर्थरायटिस दिवस दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर पाळला जातो.

2) जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग 9-15 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय पोस्टल सप्ताह साजरा करीत आहे.

3) समुद्रातून उद्भवणार्‍या असममित धोक्यासंबंधी सर्व एजन्सीजच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी ‘सागर कवच’ हा दोन दिवसीय कोस्टल सिक्युरिटी सराव अभ्यास संपन्न झाला.

4) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.

5) जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गोवा प्रत्येक ग्रामीण घरात नळपाणी जोडणी करून देशातील पहिले ‘हर घर जल’ राज्य बनले आहे.

6) उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी देहरादून येथील वीर चंद्रसिंह गढवली सभागृहात सौरऊर्जेच्या शेतीद्वारे स्वयंरोजगारासाठी मुखमंत्री सौर स्वरोजगार योजना सुरू केली.

7) केरळ उच्च न्यायालयाच्या माजी प्रथम महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती के.के. उषा यांचे निधन झाले.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) :

जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती. भारतातली हवेची गुणवत्ता 2024 सालापर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे.

सन 2017 ते सन 2024 या कालावधीत कमीतकमी 102 शहरांमधल्या पार्टीकुलेट मॅटर (PM) या प्रदूषकाचे प्रदूषण 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) करीत आहे.

भारतमाला प्रकल्प

‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.

ठळक बाबी

  • हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
  • सुमारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.
  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.
  • देशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.

मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण :

राजमाता विजयाराजे शिंदे यांना केंद्र सरकार अनोख्या पद्धतीनं अभिवादन करणार आहे. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

१२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नाण्याचं अनावरण करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) या नाण्याचं अनावरण करणार आहेत.

१०० रुपयांचं हे नाणं चार धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्याच वजन ३५ ग्रॅम आहे. या नाण्यामध्ये चांदीचा वापर ५० टक्के करण्यात आला आहे. तर इतर धातूचं प्रमाण ५० टक्के आहे.

Leave a Comment