चालू घडामोडी | 12 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक न्यूमोनिया दिन 12 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

2) इंटरस्टेट मायग्रंट पॉलिसी इंडेक्स” (IMPEX) याच्यानुसार स्थलांतरित कामगार एकत्रित करण्यात केरळने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. युरोपच्या मायग्रेशन पॉलिसी ग्रुप आणि बार्सिलोना सेंटर फॉर इंटरनॅशनल अफेयर्स या संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे.

3) गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने 13 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI परिषद आयोजित केली गेली होती.

4) डीआरडीओ भवन आवारात स्थापित अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्राच्या मॉडेलचे अनावरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.

5) महाराष्ट्रात, मुंबईतील परळ येथे मध्य रेल्वेच्या कार्यशाळेने पाचव्या नरो गेज इंजिनची निर्मिती केली असून ते कालका ते शिमला या मार्गावर कार्य करणार आहे.

6) ऑस्ट्रेलिया-इंडिया वॉटर सेंटर (AIWC) भारतीय आणि ऑस्ट्रेलियाई भागीदारांना संधी शोधून काढण्यास आणि देशांमधील संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सहकार्य तयार करण्यास मदत करणार

7) भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने (The Indian Army) बांगलादेशी सैन्याला 20 प्रशिक्षित सैन्य घोडे आणि 10 स्फोटकाचा शोध घेणारे कुत्रे भेट दिली आहेत, ज्यांना भारतीय लष्कराच्या(The Indian Army) ‘रीमाउंट एंड वेटरनेरी कॉर्प्स’ने प्रशिक्षण दिले आहे. भारतीय सैन्याने त्यांना सांभाळण्यासाठी बांगलादेश लष्कराच्या जवानांना प्रशिक्षणही दिले आहे.

शांघाय सहकार्य संघटना (SCO) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांची 20 वी शिखर परिषद :

शांघाय सहकार्य संघटना (SCO) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांच्या 20 व्या शिखर परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 10 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजन करण्यात आले. बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केले.

ठळक बाबी

  • या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतिन होते.
  • या परिषदेला SCO सचिवालयाचे महासचिव, SCO क्षेत्रीय दहशतवादविरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया या चार देशांचे निरीक्षक उपस्थित होते.
  • 2021 साली SCOचा 20 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त “SCO संस्कृती वर्ष” म्हणून साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दर्शवला. या वर्षात SCO पाककृती महोत्सव, भारतीय संग्रहालयाच्यावतीने पहिले बौद्ध वारसा प्रदर्शन भारतामध्ये आयोजित करण्यात येणार. तसेच रशियन आणि चीनी भाषेमध्ये 10 भारतीय प्रादेशिक भाषेतल्या साहित्य कृतींचा अनुवाद प्रकाशित करण्यात येणार.
  • 30 नोव्हेंबर 2020 रोजी SCO मंडळाच्या सरकारप्रमुखांची नियमित बैठक आभासी स्वरूपात होणार असून त्याचे यजमानपद भारत भूषविणार आहे.
  • नवसंकल्पना आणि स्टार्टअप्स यांच्याविषयी विशेष कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव भारताने मांडला आहे. तसेच पारंपरिक औषधांविषयी SCOचा उपगट स्थापण्याचा प्रस्तावही मांडला.

मुंबईतील एमपीएस स्कूल सर्वोत्तम शासकीय शाळांच्या क्रमवारीत :

देशातील सर्वोत्तम 10 शासकीय शाळांच्या क्रमवारीत मुंबईतील वरळी सीफेस या महापाालिकेच्या शाळेने क्रमांक पटकावला. असे स्थान पटकावणारी राज्यातील व देशातील ती पहिलीच पालिका शाळा ठरली आहे.

तिरुअनंतपुरम येथील केंद्रीय विद्यालय, नवी दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय आणि आयआयटी मद्रासच्या केंद्रीय विद्यालयाने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.

तर वरळी सीफेस एमपीएस शाळेच्या इमारतीप्रमाणेच शाळेमधील विद्यार्थ्यांसाठीच्या भौतिक सुविधा, सहशालेय उपक्रम गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावणारे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे यश संपूर्ण शिक्षण विभागाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment