चालू घडामोडी | 12 मार्च 2021

1

MPSC Current Affairs | 12 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • भारतीय नौदलासाठी स्कॉर्पिन-श्रेणीची तिसरी पाणबुडी ‘INS करंज’ 10 मार्च 2021 रोजी मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
 • जागतिक रॅपिड बुद्धीबळ विश्वविजेती कोनेरू हम्पी यांना ‘बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021’ हा सन्मान देण्यात आला आहे.
 • तेलंगणा राज्यातील पेडापल्ली जिल्ह्यातील रामगुंडम येथे 217 मेगावॅट क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प उभारला जात आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेचा (FAO) ‘किंग भूमिबोल वर्ल्ड सॉइल डे – 2020’ पुरस्कार भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) या संस्थेला देण्यात आला आहे. वर्ष 2020 मध्ये “मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा” या संकल्पनेखाली “मृदा आरोग्य विषयक जनजागृती” मधील उत्कृष्ट योगदानासाठी ICAR संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • कॅनरा बँकेचे नवीन कार्यकारी संचालक – के. सत्यनारायण राजू.
 • इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर (IATO) याचे नवे अध्यक्ष – राजीव मेहरा.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च 2021 रोजी साबरमती आश्रम (अहमदाबाद, गुजरात) येथे झेंडा दाखवून ‘पदयात्रे’ला (स्वातंत्र्य यात्रा) रवाना करणार आणि ____ या कार्यक्रमाची रंगीत तालीम असलेल्या उपक्रमांचे उद्घाटन करणार – ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ (India@75).
 • भारत आणि उझबेकिस्तान यांची “डस्टलिक 2” नामक संयुक्त सैन्य कवायत 10 मार्च 2021 रोजी ____ येथे सुरू झाली – रानीखेत (उत्तराखंड).
 • केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने _____ या राज्यांमधील 11 जिल्ह्यांमध्ये आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सह ESI (कर्मचारी राज्य विमा) योजनेचे एकत्रीकरण सुरू केले – छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र.
 • ______ सरकारने आयुषमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड बनवण्यासाठी मोहीम राबविली – उत्तरप्रदेश.
 • 12 मार्च ते 19 मार्च 2021 या कालावधीत होणाऱ्या चौथ्या जागतिक आयुर्वेद महोत्सव (GAF) याचा आयोजक – सेंटर फॉर इनोव्हेशन इन सायन्स अँड सोशल अॅक्शन (CISSA), केरळ.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या त्वरित सुधारणा कारवाई (PCA) यादीमधून ______ बँकेला बाहेर केले – IDBI बँक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here