चालू घडामोडी | 12 जुलै 2020

यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात प्रथमच ऑस्ट्रेलिया :

यंदा मालाबार नौदल युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग असेल. भारत लवकरच ऑस्ट्रेलियाला याचे निमंत्रण पाठवेल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढील आठवड्यापर्यंत औपचारिकरीत्या निमंत्रण देण्याची परवानगी मिळेल.

मालाबार नौदल युद्ध सरावात भारतासोबत अमेरिका आणि जपानही सहभागी होऊ शकतात. २०१६ पासूनच ऑस्ट्रेलियाने या युद्ध सरावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, चीनसोबतच्या संबंधांमुळे भारताने अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियाला या नौदलाच्या सरावात सहभागी करणे टाळले आहे.

काय आहे मालाबार सराव? मालाबार नौदल युद्ध सराव भारत, अमेरिका, जपानच्या नौदलादरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो. याची सुरुवात भारत आणि अमेरिकेने १९९२ मध्ये द्विपक्षीय नौदल सरावाच्या रूपाने केली होती. २०१५ मध्ये यात जपानलाही सामील करण्यात आले.

केंद्र सरकार देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक’ यांची स्थापना करणार :

केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक” यांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातली घोषणा 10 जुलै 2020 रोजी “राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन” निमित्त करण्यात आली.

“फिश क्रायोबँक” म्हणजे जिथे मत्स्य बीज (शुक्राणू) साठवून ठेवले जातात, ज्यामुळे मत्स्य उत्पादकांना निश्चित मत्स्यप्रजातीची उपलब्धता खात्रीशीरपणे होते.

ठळक बाबी

  • हा उपक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालयामार्फत राबविला जाणार आहे.
  • भारतात उभारण्यात येणारी अशी “फिश क्रायोबँक” ही जगातली पहिलीच असणार आहे.
  • फिश क्रायोबँकच्या स्थापनेसाठी नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसोर्स आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हे दोनही विभाग एकत्र काम करणार आहेत.
  • भारत सरकारने वर्ष 2020-24 या कालावधीसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसह सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’चा हा एक भाग आहे.
  • या उपक्रमामुळे प्रजातीच्या रक्षणासोबतच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात दूरगामी बदल होणार आणि उत्पादकता वाढविण्यात मदत मिळणार.
  • मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आणि मत्स्यउत्पादकांच्या कल्याणासाठी एक मजबूत आराखडा तयार करुन गुणवत्ता व आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

व्याघ्र गणनेचे जगतिक रेकॉर्ड :

देशातील 2018 मधील व्याघ्र गणनेचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला असून कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठी व्याघ्र गणना म्हणून या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

“ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2018′ च्या व्याघ्रगणनेचा निकाल गेल्यावर्षी जागतिक व्याघ्रदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता.

जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 75 टक्के म्हणजे 2,967 वाघ भारतात आढळले आहेत. “अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे.

2018-19 मध्ये कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या गणनेमध्ये वन्य जीवांचे 3,48,58, 623 फोटो घेतले गेले. त्यामध्ये 76, 651 वाघांचे आणि 51, 777 फोटो बिबट्यांचे होते. तर उर्वरित फोटो हे वनसंपदेचे होते.

मुकेश अंबानींनी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी :

भारतातले मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी २०२० हे वर्ष खूपच चांगलं ठरलं आहे. या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.

त्यांच्या रिलायन्स जीओच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. त्याचमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही या वर्षी जबरदस्त वाढ झाली आहे.

त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रसिद्ध उद्योगजक वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याबाबत फोर्ब्स इंडियाने वृत्त दिलं आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे “असीम” पोर्टल :

कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या माहितीचा प्रवाह वाढविण्यासाठी आणि मागणी-पुरवठ्यातली तफावत दूर करण्याच्या प्रयत्नात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी “असीम / ASEEM (आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध)” पोर्टल तयार केले आहे.

Leave a Reply