चालू घडामोडी | 12 फेब्रुवारी 2021

 • राष्ट्रीय उत्पादकता दिन – 12 फेब्रुवारी.
 • देशातील प्रथम नगरपालिका जी वीजनिर्मिती प्रकल्प (वैतरणा धरणावर) उभारणार आहे – बृहन्मुंबई महानगरपालिका.
 • आसामच्या मंत्रिमंडळाने ____ यांना राज्यातील पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला – धावपटू हिमा दास.
 • हे राज्य विद्यागमा योजनेच्या अंतर्गत वीटभट्ट्याजवळ तात्पुरत्या शाळा भरवत आहे – कर्नाटक.
 • केरळ सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या ‘2019 स्वदेशाभिमान-केसरी पुरस्कार’चे विजेता – येसुदासन (ज्येष्ठ व्यंगचित्रकार).
 • ‘2021 जेनेसिस प्राइज’ (टोपणनाव: “ज्यू नोबेल”) या पुरस्काराचे विजेता – स्टीव्हन स्पीलबर्ग (दिग्दर्शक).
 • 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोलकाता येथे ‘डिजिटल मॅपिंग इनोव्हेशन्स इन मेक इंडिया इनिशिएटिव्ह्ज’ संकल्पनेखाली 40 वी INCA आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणारी संस्था – नॅशनल अॅटलास अँड थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन (NATMO). 
 • तंत्रज्ञान माहिती, भविष्यवाणी आणि मूल्यांकन परिषद (TIFAC) याचे दोन नवीन उपक्रम – ‘सक्षम’ (श्रमिक शक्ती मंच) जॉब पोर्टल आणि सीवीड अभियान.
 • 11 फेब्रुवारी 2021 पर्यंत, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने सांगितलेल्या नागरी स्वराज्य संस्था सुधारणा पूर्ण करणारे सहा राज्य – (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, मणीपूर, राजस्थान, तेलंगणा आणि गोवा.
 • अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी ऑफ इंडिया (AMSI) यांच्यावतीने ____ शहरात नॅशनल सेंटर फॉर अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (NCAM) उभारले जाणार – हैदराबाद.
 • NIC प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीद्वारे दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा देणारे देशातील पहिले राज्य – ओडिशा.
 • भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास, ज्याचा फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात समारोप होईल – द्विवार्षिक थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईझ (Tropex 21).

Leave a Comment