चालू घडामोडी | 12 ऑगस्ट 2020

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित :

बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो.

दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे. हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते.

उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन :

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार.

कोंकरस-एम, इनवार, आकाश, अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेल्या स्वदेशी विकसित युद्धसामुग्रीचे उत्पादन व चाचणी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ही सुविधा मॉड्यूलर असल्याने वाढीव सुधारणांसह भविष्यातल्या सर्व क्षेपणास्त्र आयुधांना पुरवली जाणार.

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार:

हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना मुलांइतकाच समानाधिकार (समदायित्व) राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने मंगळवारी सांगितले की, ९ सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे. कारण वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार हा जन्मापासून मिळत असतो. सुधारित कायद्यातील कलम ६ अन्वये मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही.

त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे हक्क लागू आहेत. त्यामुळे याबाबतची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढावीत. हिंदू वारसा हक्क कायदा पहिल्यांदा १९५६ मध्ये अमलात आला होता. त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देणारी सुधारणा २००५ मध्ये करण्यात आली होती.

ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होते असे स्पष्ट करण्यात आले. सुधारित कायद्यातील वारसा हक्क हे जिवंत वारसा हक्क कर्त्यांच्या जिवंत असलेल्या मुलींना त्या केव्हा जन्मल्या याचा विचार न करता ९ सप्टेंबर २००५ पासून लागू होतात. पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत.

Leave a Reply