चालू घडामोडी | 11 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. युनाडेट नेशन्सने घोषित केलेला गर्ल चाईल्ड डे किंवा द डे ऑफ गर्ल्स हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जोता.

2) इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने नवीन शेती तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसार भारतीबरोबर भागीदारी केली आहे.

3) तामिळनाडूच्या चेन्नईच्या कट्टूपल्ली बंदरात भारतीय तट रक्षक (आयसीजी) च्या सातव्या ऑफशोर पेट्रोलिंग जहाजचे ‘विग्रह’ चे औपचारिक अनावरण करण्यात आले.

4) नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी एम ए गणपति यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

5) केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थंवरचंद गहलोत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे “मानसिक आरोग्यावरील आंतरराष्ट्रीय परिषद: कोविड 19 च्या पलीकडे पाहणे” चे आभासी उद्घाटन केले.

6) ॲमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहकांना ॲमेझॉनवर आरक्षित रेल्वे तिकिट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ (IRCTC) सह भागीदारी केली आहे.

7) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुदुचेरी येथील अरुपार्थपुरम येथील एनएच 45-ए वर रेल्वे पातळीवरील ओलांडणारा एक किलोमीटर लांबीचा रस्ता ओव्हर-ब्रिज व्हिडीओ कॉन्फरन्स मोडद्वारे राष्ट्राला समर्पित केला.

8) देशातील नैसर्गिक वायूच्या विपणनामध्ये सरकारने मोठ्या सुधारणांना मान्यता दिली.

“रूद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र :

9 ऑक्‍टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सुखोई लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले विकिरण-रोधी क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर RF (रेडियो फ्रिक्वेन्सी) उत्सर्जित करणाऱ्या दूरसंचार घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात.

स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी :

भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची दुसरी यादी स्विस सरकारकडून प्राप्त झाली आहे.

स्वित्झर्लंडच्या मते, भारतासह ८६ देशांना ३१ लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) ही माहिती दिली आहे. यापूर्वी स्वित्झर्लंडनं सप्टेंबर २०१९ मध्ये भारतासह ७५ देशांना याबाबत माहिती दिली होती. एफटीएनं शुक्रवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात भारताला AOEI अंतर्गत २०१९ मध्ये स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती.

यामध्ये ७५ देशांचा समावेश होता. यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल ३१ लाख खात्यांचा समावेश असल्याचं म्हटलं होतं. परंतु स्पष्टपणे यात भारताचं नावं नव्हतं. स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचं नाव असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

‘ऑस्कर’ अकादमीच्या समितीवर मराठमोळ्या उज्वल निरगुडकर यांची निवड :

ऑस्कर अकादमीचे (Oskar) सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर (Ujwal Nirgudkar) यांना हा मान मिळाला आहे. ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर यांची निवड झाली आहे.

ऑस्कर अकादमी त्याच्या संपूर्ण नावातील ‘आर्ट्स’प्रमाणे ‘विज्ञान’ विभागासाठीदेखील तितकीच कार्यक्षम असते. कलाकार, चित्रपट यांच्या पुरस्कारांप्रमाणे त्यासंबंधी असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीही पुरस्कार दिले जातात. त्याची निवड करण्याचं काम विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीकडे असतं.

Leave a Comment