चालू घडामोडी | 11 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) देशात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात.

2) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी 2021-26 च्या कालावधीसाठी आपला अहवाल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना सादर केला.

3) ‘मिशन शक्ती’ उपक्रमाच्या अंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) ‘अॅंटी-सॅटेलाईट (ए-सॅट)’ क्षेपणास्त्र नावाच्या उपग्रह-भेदी क्षेपणास्त्र प्रणालीचे एक प्रतिरूप तयार केले. दिल्लीत त्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले.

4) नागालँड सरकारने वार्षिक ‘हॉर्नबिल महोत्सव 2020’ 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत संपूर्णपणे आभासी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवात नागा आदिवासींचा वारसा, संस्कृती, भोजन आणि चालीरिती प्रदर्शित केल्या जातात.

5) मल्याळम लेखक एस. हरीश यांना त्यांच्या ‘मुस्टॅच’ कादंबरीसाठी ‘JCB प्राइज फॉर लिटरेचर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 25 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस मिळणार. JCB प्राइज हा भारतातला सर्वात श्रीमंत साहित्यिक पुरस्कार म्हणून ओळखले जातो.

6) संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) दिल्ली येथील अग्नी स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्र (CFEES) या संस्थेनी ‘अग्नीशोधक आणि अग्नीशमन प्रणाली (FDSS)’ तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याच्या मदतीने बसमधल्या प्रवाशांच्या भागात लागलेली आग केवळ 30 सेंकदात कळू शकते आणि त्यानंतर 60 सेंकदात तिच्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.

7) अरुणाचल प्रदेशमधील पक्के व्याघ्र प्रकल्प (पीटीआर) आठ-राज्य ईशान्येकडील कोविड -19 विरुद्ध “हरित सैनिक” साठी विमा संरक्षण पुरवणारे पहिले राज्य ठरले आहे. आठ-राज्य ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

प्रकल्प अरुणाचल प्रदेशात उभारला :

अरुणाचल प्रदेशात भारताचा पहिला अनेक खेड्यांसाठीचा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

ठळक बाबी

  • अरुणाचल प्रदेशाच्या लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील्या 39 खेड्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
  • 17,480 लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रकल्प संरचीत केलेला आहे. प्रकल्प 28.50 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे.
  • प्रकल्पात पिण्याचे पाणी, हरित ऊर्जा आणि पर्यटन अश्या घटकांसह हा एकात्मिक प्रकल्प म्हणून तयार केला गेला आहे. व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जसे की एनर्जी-सोलर ग्रिड, SCADA ऑटोमेशन सिस्टम, प्री-फॅब्रिकेटेड झिंक अलम स्टोरेज टाकी, यांचा वापर केला गेला आहे.
  • प्रकल्पामध्ये स्विमिंग पूल, अॅ्म्फीथिएटर, कारंजे आणि बसण्याची व्यवस्था अश्या सोयी उभारून त्याला एक मनोरंजनाचे स्थळ म्हणून स्वरूप देण्यात आले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डी. लिट :

सार्वजनिक जीवनात गेली 60 वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.

जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली. तर यावेळी राजस्थानी सेवा संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया, वनश्री वालेचा उपस्थित होते.

IPL2020 Final : मुंबई इंडियन्सने पटकावले विजेतेपद

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटनीं पराभव करत विजय संपादित केला.

या विजयासह मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे.

Leave a Comment