चालू घडामोडी | 11 मार्च 2021

MPSC Current Affairs | 11 March 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 10 मार्च 2021 पासून उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री – श्री तीरथ सिंग रावत.
 • दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारने अंगणवाडी हबच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तिकरणासाठी “सहेली समन्वय केंद्र” योजना सुरू करण्याची घोषणा केली.
 • पारादीप प्लॅस्टिक पार्क विकसित करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि ओडिशा औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळ (IDCO) यांच्यात सामंजस्य करार झाला.
 • चंदिगड सरकारने दिलेला, ‘इंदिरा गांधी महिला शक्ती पुरस्कार 2021’चे विजेता – सुमेधा धानी.
 • भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांना दोन आठवडे बैटरी रिचार्ज केल्याशिवाय चालविण्यास सक्षम करणारी एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) प्रणाली तयार करणारी संस्था – संरक्षण संशोधन व विकास संघटनेची (DRDO) नौदल साहित्य संशोधन प्रयोगशाळा (NMRL).
 • वर्ष 2021 साठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाह्य लेखा परीक्षकांच्या समितीचे अध्यक्ष – भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) गिरीश चंद्र मुर्मू.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहामार्फत संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी एका उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहेत. नासा आणि इस्रो यांच्या (निसार) या संयुक्त प्रकल्पात दुहेरी कंप्रता एल व एस बँड असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे. ‘निसार’ ही दोन वेगेवगेळ्या कंप्रता ए बँड व एस बँडसाठी असणारी पहिलीच मोहीम आहे.
 • आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात दिलेल्या योगदानाबद्दल इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्चिव्ह्ज (FIAF) कडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणारे पहिले भारतीय – अमिताभ बच्चन.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी योजना, ज्याला ‘वित्त कायदा 2007’च्या कलम 136-ब अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून उभारण्यात येणार – प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी (PMSSN).
 • 10 मार्च 2021 रोजी, ____ येथे “राष्ट्रीय सगर्भता मधुमेह जागृती दिन” शिखर परिषद आयोजित करण्यात आली – बेंगळुरू.
 • भारतीय नौदलाची स्कॉर्पिन प्रकारची तिसरी पाणबुडी, जी मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल झाली – INS करंज.
 • भारतातील पहिली बँक, ज्याने ‘वेअर एन पे’ या नावाने वेअरेबल कॉन्टॅक्टलेस पेमेंट उपकरण सादर केले – अ‍ॅक्सिस बँक.
 • पर्यटन मंत्रालयाने _____ याला स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकासासाठी ओळखल्या गेलेल्या पंधरा विषयांनुरूप सर्किटांपैकी एक म्हणून ओळखले – ग्रामीण सर्किट.
 • फ्रान्सने या आठवड्यात पहिल्यांदाच अवकाशात लष्करी अभ्यास सुरू केला. अंतराळातून होणाऱ्या हल्ल्यापासून फ्रान्सचे उपग्रह आणि इतर संरक्षण उपकरणांचे संरक्षण करण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी हा अंतराळातील युद्धसराव केला गेला. या अंतराळातील युद्धसरावाचे कोड नाव “ऍस्टरेक्‍स’ असे आहे. फ्रान्सने 1965 साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
 • _____ यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च आणि 10 मार्च 2021 रोजी जागतिक सरकार शिखर परिषद संघटना (WGSO) यांच्यावतीने ‘जागतिक सरकार शिखर परिषद संवाद’ आयोजित करण्यात आले होते – संयुक्त अरब अमिरात (UAE).

1 thought on “चालू घडामोडी | 11 मार्च 2021”

Leave a Comment