चालू घडामोडी | 11 फेब्रुवारी 2021

  • 2021 साली ‘विज्ञानात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ (11 फेब्रुवारी) याची संकल्पना – “विमेन सायंटिस्ट्स अॅट द फोरफ्रंट ऑफ द फाइट अगेन्स्ट कोविड-19”.
  • महामार्गांवर प्राणघातक अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी या राज्याच्या महामार्ग पोलीस विभागाने सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर ‘मृत्युंजय दूत’ नामक राज्यव्यापी उपक्रम राबवित आहे – महाराष्ट्र.
  • 25 व्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFK) आयोजन स्थळे – तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम, थलेसेरी आणि पलक्कड.
  • ऊर्जा कार्यक्षम पंपसेट आणि परिचालन पद्धतींसंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि _____ यांच्यात सामंजस्य करार झाला – ब्यूरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE).
  • आर्थिक बाबीसंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या समितीने युरियाच्या उत्पादनासाठी _____ येथील ब्रम्हपुत्र व्हॅली फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन लिमिटेड या उपक्रमाला 100 कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली – नामरूप (आसाम).
  • कृषी आणि फलोत्पादनाच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी 6,865 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीसह कृषी मंत्रालयाची नवीन योजना – ‘10,000 कृषी उत्पादन संघटनांची स्थापना आणि प्रोत्साहन’.
  • 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत, 12 राज्ये ज्यांनी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने सूचित केलेल्या ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ यंत्रणेसंबंधी सुधारणांना यशस्वीरित्या अंमलात आणले – (अनुक्रमे) आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान.
  • _____ अंतर्गत भू-शास्त्र मंत्रालयाने अत्याधुनिक हवामान आणि वातावरण अंदाज पद्धती विकसित केल्या आहेत, ज्यात लहान श्रेणीपासून ते मध्यम श्रेणी (1-10 दिवस), विस्तारित श्रेणी (10 दिवस ते 30 दिवस) आणि हंगामी (एका हंगामापर्यंत) अश्या पद्धतींचा समावेश आहे – राष्ट्रीय मान्सून अभियान (NMM).
  • ____ या संस्थेच्या संशोधकांनी आइनस्टाइनियम (अणु क्रमांक 99) हे जड मूलद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे – कॅलिफोर्नियाची बार्कले नॅशनल लॅबोरेटरी.

Leave a Comment