चालू घडामोडी | 11 ऑगस्ट 2020

0

अंदमान आणि निकोबारमध्ये ऑप्टिकल फायबर प्रकल्प सुरू :

अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि ११ ऑगस्ट रोजी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.

३० डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी २३१२ कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत.

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिट्ल अंदमान, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप या प्रमाणे इंटरनेट सेवा जोडली जाणार असून अंदमान निकोबार भागात आजपासून इंटरनेट सेवा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे.

१२२४ कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. पोर्ट ब्लेअरला इंटरनेटचा वेग सेकंदाला ४०० गिगॅबाइट असून इतर बेटांवर इंटरनेटचा वेग सेकंदाला २०० जीबी आहे.

वेंकटरायपूर आणि नोलियासाही (ओडिशा): UNESCO-IOC तर्फे “सुनामी रेडी” दर्जा प्राप्त करणारी गावे

ओडिशाची किनारपट्टीवरील वेंकटरायपूर (गंजम जिल्हा) आणि नोलियासाही (जगतसिंगपूर जिल्हा) या दोन गावांना UNESCOच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोग (IOC) तर्फे “सुनामी रेडी” म्हणजेच “सुनामीसाठी तयार” हा दर्जा दिला गेला आहे.

हा दर्जा प्राप्त करणारी ही भारतातली तसेच हिंद महासागर प्रदेशातली प्रथम गावे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) यांच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोगाने (IOC) “सुनामी रेडी” हा सुनामीच्या तयारीवर आधारित असलेला कार्यक्रम तयार केला आहे.

किनारपट्टीवरील लोकांना सुनामीच्या धोक्यासाठी तयार करणे, जिवितहानी आणि मालमत्तेची हानी कमी करणे आणि समुदायाची रचनात्मक आणि पध्दतशीरपणे उत्तम सराव संकेत तयार करणे ही या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

डाॅ. द. दि. पुंडे यांना मसापचा डाॅ. जोगळेकर स्मृती पुरस्कार :

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, दरवर्षी मराठी वाङ्मय क्षेत्रातील बहुमोल योगदान दिल्याबद्दल मानाचा पुरस्कार दिला जातो. मराठीच्या अध्यापनाबरोबरच वाङ‌्मयेतिहासाचे तत्त्वज्ञान या विषयासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉ. द. दि. पुंडे यांना या वर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १४ ऑगस्ट रोजी डॉ. द. दि पुंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. पुंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

महात्मा गांधींनी घातलेल्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घातलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला.

या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहे. इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती.

दक्षिण-पश्‍चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ‘ईशान्य ब्रिस्टल ऑक्‍शन’ कंपनीने रविवारी सांगितले की, त्यांच्या पोस्टमध्ये असलेल्या चष्म्याच्यामागे इतका गौरवशाली इतिहास असू शकतो हे जाणून आम्हाला आश्‍चार्य वाटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here