चालू घडामोडी | 10 ऑक्टोबर 2020

स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ‘मालमत्ता पत्र’चे वाटप :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2020 रोजी एका कार्यक्रमात स्वामित्व योजनेच्या अंतर्गत मालमत्ता पत्रांचे (Property Card) वाटप केले जाणार आहेत.

स्वामित्व / SVAMITVA (Survey of villages and mapping with improvised technology in village areas) ही केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे.

24 एप्रिल 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना कर्ज घेताना किंवा इतर आर्थिक लाभ घेताना संपत्ती म्हणून त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्याचा मार्ग या योजनेमुळे सुकर होणार आहे.

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कार 2020 :

साहित्य आणि शांती यासाठी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

  • नोबेल शांती पुरस्कार 2020 याचे विजेता – संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (World Food Programme)
  • साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता – लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)

जागतिक खाद्यान्न कार्यक्रम ही जागतिक उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्यान्न सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी सर्वात मोठी संघटना आहे. ती एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 01 जानेवारी 1961 रोजी झाली. रोम (इटली) या शहरात त्याचे मुख्यालय आहे.

रेडिओलहरीवेधी ‘रुद्रम-१’ची यशस्वी चाचणी :

डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हवाई दलासाठी विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-१ या रेडिओलहरीवेधी क्षेपणास्त्राची शुक्रवारी सुखोई-३०द्वारे ओदिशातील बालासोर तळावरून यशस्वी चाचणी केली.

रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचीवर डागले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकेत अथवा लहरी पकडण्यासाठीही हे क्षेपणास्त्र तत्पर आहे. या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरता येऊ शकते.

रुद्रम-१ची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यामध्ये काही बदल अपेक्षित असल्याने त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन :

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील.

“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. श्रीकांत दातार १ जानेवारी २०२१ रोजी हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील.

Leave a Comment