चालू घडामोडी | 10 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन १० नोव्हेंबरला साजरा केला जातो. सयुंक्त राष्ट्र संघाच्यावतीने २००२ साला पासून हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला.

2) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ‘उद्यम’ योजनेची अंमलबजावणी करीत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, योजनेच्या अंतर्गत 11 लाखांहून अधिक उद्योगांनी नोंदणी केली आहे.

3) केरळ सरकारने मासेमारीच्या शाश्वत उपजीविकेसाठी “परिवर्तनम्” योजना तयार केली आहे. मासेमारी करणार्‍या कोळी समुदायाचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना आहे.

4) कामगार व रोजगार मंत्रालय ‘अटल बिमीत व्यक्ति कल्याण योजना’ (ABVKY) याची अंमलबजावणी करीत आहे.

5) भारत आणि चीन दरम्यान 6 नोव्हेंबर 2020 रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत-चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरील असमहतींच्या मुद्यांवर दोन्ही बाजूंनी स्पष्ट, सखोल आणि रचनात्मक आदानप्रदान करण्यात आले.

6) अरुणाचल प्रदेशात भारताचा पहिला सौर-आधारित एकात्मिक पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातल्या 39 खेड्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

7) भारत सरकारने जलवाहतुक मंत्रालयाचे नामकरण केले असून नवे नाव “बंदरे, जलवाहतुक आणि जलमार्ग मंत्रालय (Ministry of Ports, Shipping and Waterways)” असे आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गांशी संबंधीत नियम व कायदे तयार करणारी आणि प्रशासनासाठीची ही सर्वोच्च संस्था आहे. मंत्रालयाच्या प्रमुखपदी मनसुख एल. मांडवीय आहेत.

8) भारतीय मुत्सद्दी विदिशा मैत्रा या संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांविषयीची सल्लागार समिती (ACABQ) यामध्ये सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत निवडून आल्या.

अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती :

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली. विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.

करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे. करोना टास्क फोर्समधील १३ सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी शनिवारी रात्री डेलावेयरच्या विलमिंगटनमध्ये आपल्या विजयाच्या भाषणात म्हटलं होतं, “आम्ही कोविड संदर्भातील योजनांच्या मदतीसाठी आणि २० जानेवारी २०२१ पासून याच्या अंमलबजावणीसाठी आघाडीच्या वैज्ञानिक आणि विशेषज्ञांच्या गटाची घोषणा करणार आहोत.” मात्र, या टास्क फोर्सचं नेतृत्व कोण करेल याची माहिती बायडन यांनी तेव्हा दिली नव्हती.

पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : मेदवेदेवला जेतेपदासह चौथे स्थान

रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान मिळवले. चौथे स्थान मिळवताना मेदवेदेवने विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला मागे टाकले.

मेदवेदेवने अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर ५-७, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही मेदवेदेवने ही बाजी मारली. त्याचे हे या वर्षांतील पहिले विजेतेपद ठरले.

Leave a Comment