चालू घडामोडी | 10 फेब्रुवारी 2021

  • जागतिक डाळी दिन – 10 फेब्रुवारी.
  • हे राज्य सरकार डिजिटल अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य ठरणार आहे – उत्तरप्रदेश.
  • कर्नाटक राज्याच्या विधान परिषदेचे नवे सभापती – बसवराज होरत्ती.
  • या राज्य सरकारने राज्यभरातील ग्रामपंचायत पातळीवरील आकडेवारीचे व माहितीच्या डिजिटलकरणासाठी ICICI बँकेबरोबर सामंजस्य करार केला – छत्तीसगड.
  • ‘मेरा घर मेरा विद्यालय’ (मोहल्ला क्लास) योजना _____ शहरात प्रारंभ करण्यात आली – वाराणसी, उत्तरप्रदेश.
  • कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा सहावा भारतीय आणि कपिल देव व अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज – इशांत शर्मा.
  • 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ‘आपल्या सामायिक भविष्याची पुनर्व्याख्या: सर्वांसाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण’ या संकल्पनेखाली आयोजित केल्या जाणाऱ्या ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021’ याचा आयोजक – ‘द एनर्जी अँड रिसोअर्सेस इंस्टीट्यूट (TERI)’.
  • भारत आणि अफगाणिस्तान या देशांनी ___ नदीच्या पात्रात लालांदर (शहतूत) धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करार केला – काबूल नदी.
  • आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) याच्या ‘इंडिया एनर्जी आउटलुक 2021’ अहवालानुसार, ____ पर्यंत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक म्हणून युरोपीय संघाला मागे टाकील – वर्ष 2030.
  • ‘इंडिया एनर्जी आउटलुक 2021’ अहवालानुसार, जगातील सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक – चीन (द्वितीय: अमेरिका).

Leave a Comment