चालू घडामोडी | 1 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक शाकाहार दिवस १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

2) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन असलेली केमो रिकव्हरी किट लॉन्च करण्यात आले.

3) अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी सौर ऊर्जेविना चंद्र मोहीम चालविण्यासाठी नवकल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने ‘वॅट्स ऑन द मून’ स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी हिरॉक्स संस्थेसोबत भागीदारी करार केला.

4) ITBP चे महासंचालक एस. देसवाल यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या अतिरेकी विरोधी शक्तीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

5) प्रख्यात चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष, FTII सोसायटीचे अध्यक्ष आणि एफटीआयआयच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.

6) खातेदारांची फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक जागृती मोहिमेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी अमिताभ बच्चन यांची निवड केली.

7) भारतीय रिझर्व्ह बँकेनी संकटात सापडलेल्या चेन्नईत मुख्यालय असलेल्या लक्ष्मी विलास बँकेचे कामकाज पाहण्याकरिता तीन सदस्य असलेली संचालक समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष मीता माखन या असून त्यात शक्ती सिन्हा आणि सतीशकुमार कालरा हे देखील आहेत.

8) आसामच्या इतिहासातील एकमेव महिला मुख्यमंत्री सय्यदा अनवारा तैमूर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या.

सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

भारताने बुधवारी ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या पीजे-10 प्रकल्पातंर्गत ही चाचणी करण्यात आली.

300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.

आणखी तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा :

भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत –

  • भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)
  • न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड
  • भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)

Leave a Comment