चालू घडामोडी | 01 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक शाकाहार दिवस १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

2) तेलंगणा सरकारने जमीन व मालमत्ता-संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी ‘धरणी’ संकेतस्थळ तयार केले. त्याचे उद्घाटन मलकाजगिरी जिल्ह्यातल्या मुडू चिंतालपल्ली गावात करण्यात आले.

3) केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती व दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याच्या सहमतीस मान्यता दिली आहे.

4) संशोधन कार्यासाठी महिला वैज्ञानिकांना फेलोशिप आणि संशोधन अनुदान देण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने “SERB-POWER (प्रोमोटिंग ऑपर्चुनिटीज फॉर विमेन इन एक्सप्लोरेटरी रिसर्च)” या नावाची नवीन योजना जाहीर केली आहे.

5) शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परराष्ट्र अर्थव्यवस्था आणि विदेश व्यापार कार्यांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या 19 व्या बैठकीचे आयोजन भारताने केले.

6) भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) तर्फे 31 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या 200 किलोमीटर अंतराच्या ‘फिट इंडिया वॉकथॉन’चे उद्घाटन केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जैसलमेर (राजस्थान) येथे करण्यात आले.

7) UK-इंडिया बिझिनेस कौन्सिल (UKIBC) यांच्यावतीने ‘डूईंग बिझनेस इन इंडिया रिपोर्ट, 2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. महामारीच्या काळात व्यवसायासंबंधी माहिती यात दिली गेली आहे.

8) भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे. अॅप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.

9) 2022 साली ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार’ (NISAR) उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) यांच्यात करार झाला.

10) जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील फलोत्पादन संकुल राज बाग येथे सफरचंद उत्पादकांसाठी मार्केट हस्तक्षेप योजना (MIS) -2020 लॉन्च केली.

भारतासह चार देशांच्या नौदलांच्या संयुक्त कवायती दोन टप्प्यांत :

भारतासह चार देशांच्या नौदलांच्या संयुक्त कवायती पुढील महिन्यात दोन टप्प्यांत होणार आहे. मालाबार असे नामकरण करण्यात आलेल्या नौदल कवायतींमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देशही सहभागी होणार आहेत.

संयुक्त नौदल कवायतींचा पहिला टप्पा 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनाऱ्यालगत होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 17 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अरबी समुद्रात कवायती होतील. त्यामध्ये युद्धनौका, पाणबुड्या, सागरी विभागात गस्त घालणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स विविध प्रकारची प्रात्यक्षिके आणि आपली क्षमता दाखवतील.

भारत आणि अमेरिकी नौदलांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा भाग म्हणून 1992 मध्ये मालाबार कवायती सुरू झाल्या. त्यानंतर 2015 पासून जपान त्या कवायतींचा भाग बनला. यावेळी भारताच्या निमंत्रणावरून ऑस्ट्रेलियाही त्या कवायतींमध्ये सहभागी होणार आहे.

केरळ, गोवा, चंदिगड सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश :

पब्लिक अफेअर सेंटर (Public Affairs Centre India – PAC India) या संस्थेने देशातील सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करुन जाहीर केली. संस्थेच्या अहवालानुसार केरळ आणि गोवा ही राज्य तसेच चंदिगड हा केंद्रशासीत प्रदेश या ठिकाणी सुशासन आहे. पीएसीच्या अहवालानुसार केरळ हे देशातील सर्वाधिक सुशासीत राज्य आहे तर उत्तर प्रदेश हे सुशासीत राज्यांच्या यादीत शेवटच्या राज्यांपैकी एक आहे.

बंगळुरू येथील पब्लिक अफेअर सेंटर ही एक स्वयंसेवी संस्था आहे. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे पाहणी करुन ही संस्था देशातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांची सुशासनाच्या बाबतीत क्रमवारी निश्चित करुन अहवालाच्या माध्यमातून जाहीर करते. भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन पब्लिक अफेअर सेंटरचे अध्यक्ष आहेत. पब्लिक अफेअर सेंटरने ताजे रँकिंग राज्यांतील आणि केंद्रशासीत प्रदेशांतील शाश्वत विकासाच्या आधारे निश्चित केले आहे. 

Leave a Comment