चालू घडामोडी | 01 मार्च 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 1st March 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 2021 साली ‘शून्य भेदभाव दिन’ (1 मार्च) याची संकल्पना – एंड इनइक्वलिटीज.
 • 2021 साली ‘जागतिक नागरी सुरक्षा दिन’ (1 मार्च) याची संकल्पना – “सिव्हिल डिफेन्स अँड ए फर्स्ट ऐडर इन एव्हरी होम”.
 • डॉ विश्वास मेहता याच्या जागी, 28 फेब्रुवारीपासून केरळचे नवे मुख्य सचिव – व्ही. पी. आनंद.
 • या राज्य सरकारने 27 फेब्रुवारी रोजी “घरोकी पहचान, चेलीक नाम” (मुलीचे नाव घराची ओळख आहे) कार्यक्रम सुरू केला – उत्तराखंड.
 • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाशी सल्लामसलत करून देशभरातील ____ जिल्ह्यांसाठी विविध क्षेत्रामधून ‘वन डिस्ट्रिक्ट वन फोकस प्रॉडक्ट’ योजनेसाठी उत्पादनांची अंतिम निवड केली – 728 जिल्हे.
 • ____ या संस्थेने इंडियन रेडक्रॉस संस्थेसोबत सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी आणि भारतातील तरुणांना एक चांगला मनुष्य आणि जागतिक नागरिक बनविण्यासाठी सामंजस्य करार केला – जीएनए विद्यापीठ, फगवाडा, पंजाब.
 • अजय भूषण पांडे यांच्या जागी, 28 फेब्रुवारी 2021 पासून भारताचे नवे वित्त सचिव – तरुण बजाज.
 • तेलुगु साहित्य आणि तेलगू व संस्कृत भाषेतील संशोधनात योगदान दिल्याबद्दल ‘केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार 2021’चे विजेता – वेलचेरू नारायण राव.
 • जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या, ‘युवा’ श्रेणीच्या अंतर्गत ‘जानकी अम्मल – राष्ट्रीय महिला जैव वैज्ञानिक पुरस्कार 2020-21’चे प्राप्तकर्ता – प्रा. नीतू सिंग (IIT दिल्ली)
 • हिंद महासागर प्रदेशातील क्रियाकलापांवर नजर ठेवण्यासाठी, संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) तरूण वैज्ञानिकांच्या पथकाने तयार केलेला ‘____’ उपग्रह 28 फेब्रुवारी रोजी PSLV-C51 प्रक्षेपकाचा वापर करून अंतराळात यशस्वीपणे तैनात करण्यात आला – ‘सिंधू नेत्र’ उपग्रह.
 • ___ संस्थेच्या संशोधकांनी ‘माहिती हस्तांतरण’ प्रणाली विकसित केली आहे जी USB पेक्षा 10 पट वेगवान माहिती प्रसारित करू शकते – मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका.
 • _____ देशाने आर्क्टिक हवामान आणि वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी सोयुझ-2.1b प्रक्षेपकाचा वापर करून पहिले ‘आर्क्टिका-एम’ उपग्रह प्रक्षेपित केला – रशिया.

Leave a Comment