चालू घडामोडी | 01 जून 2020

IASST संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त ‘स्मार्ट बँडेज’ विकसित केले :

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” विकसित केले आहे, जे जखमेसाठी उपयुक्त असून औषधाचा pH टिकुन राहतकापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून अतिसूक्ष्म तंत्रज्ञानावर (nanotechnology) आधारित ‘कॉटन पॅच’ विकसित करण्यात आला आहे.

ठळक बाबी : डॉ. देवाशिष चौधरी यांनी केलेल्या संशोधनात, ज्युट कार्बन डॉट्ससह नॅनो कॉम्पोजिट हायड्रोजेलयुक्त कॉम्पॅक्ट कॉटन पॅच तयार केले गेले. फ्लोरोसंट कार्बन डॉट्सचे सिंथेसाइझिंग करण्यासाठी ज्यूटचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे आणि ते पसरले जावे यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. कडुलिंबाच्या पानांचा (आझादिराछताइंडिका) अर्क हे नमुना औषध अभ्यासात उदाहरण म्हणून घेतले गेले आहे.

उत्तेजक-प्रतिसाद देणाऱ्या या नव्या औषध वितरण प्रणालीमध्ये, ज्युट कार्बन डॉट्स हायड्रोजेल मॅट्रिक्स-कॉटन पॅचमध्ये बंदिस्त केले असून दोन वेगळ्या pH पातळीवर प्रभावीपणे औषध पुरवठा करू शकतात.

जखमेत जीवाणूचा संसर्ग वाढल्यास फॅब्रिकेटेड हायब्रिड कॉटन पॅचचा उत्तेजक-प्रतिसादात्मक गुणधर्म फायद्याचा ठरतो आणि यामुळे खालच्या pH कडे औषध जाते जे या परिस्थितीत अनुकूल असते. कॉटन पॅचचे हे pH-प्रतिसादात्मक वर्तन कार्बन डॉट तयार करताना वेगवेगळ्या मॉलेक्युलर संबंधांमुळे सिस्टममध्ये समाविष्ट केलेल्या जूट कार्बन डॉट्सच्या विशिष्ट वर्तनानुसार आहे.

हायब्रीड कॉटन पॅचच्या अशा उत्तेजक-प्रतिसाद वर्तनाचा विकास जखमेसाठी ते स्मार्ट ड्रेसिंग किंवा मलमपट्टी म्हणून वापरण्याचा मार्ग सुकर झाला. पॅच तयार करण्यासाठी कॉटन आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जैव-संगत, बिन विषारी, कमी खर्चाची आणि टिकाऊ झाली आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटची शिफारस :

जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगटची खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. तर रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेली विनेश ही सध्या भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे.

गेल्या वर्षीदेखील खेलरत्नसाठी तिची शिफारस झाली होती. मात्र कुस्तीपटू बजरंग पूनियाला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. गेल्या तीन वर्षांत विनेशची सातत्यपूर्ण कामगिरी झाली आहे. तसेच जकार्ता येथे आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2019 मध्ये नूर सुलतान येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, या वर्षांच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे आशिया कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अशी कामगिरी विनेशने केली आहे.

साक्षी मलिकला 2016 मध्ये खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मात्र तरीदेखील तिने अर्जुन पुरस्कारासाठी निवड व्हावी असा अर्ज पाठवला आहे.

नेपाळमध्ये नकाशासाठी घटना दुरुस्ती विधेयक सादर :

भारताच्या सीमेच्या वादाच्या पार्श्ववभूमीवर देशाच्या नकाशामध्ये बदल करण्याचा उद्देशाने नेपाळ सरकारने रविवारी संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक मांडले. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळ कॉंग्रेसनेही या कायद्याला पाठिंबा दिल्यानंतर नेपाळ सरकारच्यावतीने कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज मंत्री शिवमय तुंबहंगपे यांनी हे विधेयक मांडले, हे घटनेत दुरुस्ती करणारे दुसरे विधेयक असेल.

नेपाळने अलीकडेच देशाचा सुधारित राजकीय व प्रशासकीय नकाशा जाहीर केला आहे. या नकाशाद्वारे नेपाळने लिपुलेख, कलापानी आणि लिंपियाधुरा या संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या भूभागांवर हक्क सांगितला आहे. मात्र या दाव्याद्वारे नेपाळने केलेल्या आपल्या भूमीच्या विस्ताराला भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे.

राज्यघटनेच्या अनुसूची 3 मध्ये समाविष्ट असलेल्या नेपाळच्या राजकीय नकाशामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव या नवीन विधेयकात करण्यात आला आहे. या विधेयकाच्या मंजूर होण्याने नेपाळचा भौगोलिक आणि राजकीय नकाशा बदलणार आहे.

Leave a Reply