चालू घडामोडी | 01 जुलै 2020

0

‘सर जाडेजा’ २१ व्या शतकातला भारताचा Most valuable player, विस्डनकडून बहुमान :

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Wisden ने जाडेजाला २१ व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे.

तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने जाडेजाचं नाव घोषित केलं आहे. ९७.३ गुण मिळवत जाडेजाने हा मान पटकावला आहे. “रविंद्र जाडेजाची या स्थानासाठी निवड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू शकतं.

कसोटी क्रिकेटमध्ये संघाची निवड होताना तो कधीही पहिली पसंती नसतो. पण ज्यावेळेला त्याला संधी मिळाली आहे, त्या सामन्यांत जाडेजाने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत सहाव्या स्थानावर आश्वासक फलंदाजी केली आहे.

त्याच्या गोलंदाजीची सरासरी ही अनेक माजी दिग्गज गोलंदाजांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. याव्यतिरीक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या निकषांमध्येही जाडेजा उजवा आहे.” Wisden साठी माहिती गोळा करणाऱ्या Cricviz संस्थेच्या फ्रेडी वाईल्ड यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

“प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प

कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.

नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला :

चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला. त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग 23 वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. सुत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग 1997 पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे.

भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस – २००० बॉम्ब :

भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे. या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल.

मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता. एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत.

पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे. भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here