चालू घडामोडी | 09 ऑगस्ट 2020

0

पंतप्रधानांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा शुभारंभ होणार :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून “कृषी पायाभूत सुविधा निधी” (Agriculture Infrastructure Fund) अंतर्गत एकूण 1 लक्ष कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधांचा शुभारंभ करणार आहेत.

पंतप्रधान पीएम-किसान योजनेच्या अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या सहावा हप्त्याच्या निधीचे वितरण देखील करणार आहेत.

गिरीश चंद्र मुर्मू: 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG)

भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली.

भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे, जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो.

याशिवाय, CAG सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य लेखापरिक्षक आहेत आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करतात.

महाराष्ट्र सरकारचा आभासी वर्ग भरविण्यासाठी गुगल कंपनीसोबत करार :

महाराष्ट्र सरकारने आभासी वर्ग भरविण्यासाठी गुगल कंपनीसोबत करार केला. हे भारतातले पहिले राज्य ठरले आहे ज्याने ऑनलाइन शिक्षणाकरिता गूगल कंपनीच्या ‘जी सूट फॉर एज्युकेशन’ आणि ‘गूगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी केली.

या प्रकल्पात 1.09 लक्षाहून अधिक खासगी, सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत आणि यांचा 22.03 लक्षाहून अधिक विद्यार्थ्यांचा लाभ होणार.

“तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन :

4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते मिझोरम राज्याच्या एझवाल जिल्ह्यात “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले.

हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेच्या अंतर्गत तयार केला जात आहे. मिझोरमच्या तेंझाल आणि साऊथ झोटेच्या सेर्शिप व रीक जिल्ह्यात 92.25 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. एकूण क्षेत्रफळ 105 एकर असून 18 होल सह गोल्फचे मैदान 75 एकर क्षेत्रफळावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here