चालू घडामोडी | 07 ऑगस्ट 2020

व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कठोर अटी :

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) व्यवसायिक पातळीवर भूजलाचा वापर करण्याबाबत कठोर अटी निश्चित केल्या आहेत. त्याखालीलप्रमाणे आहेत,

  • पर्यावरण-विषयक दुष्प्रभावाच्या मूल्यांकनाशिवाय व्यवसायिक संस्थांना भूजल वापरण्याची परवानगी नाही.
  • परवानगी घेण्यात आलेल्या मर्यादेपर्यंतच पाण्याचा उपसा केला जावा आणि संपूर्ण क्रिया निरीक्षणाखाली असली पाहिजे.
  • संबंधित प्राधिकरण 3 महिन्यांत सर्व अत्यधिक वापर, गंभीर आणि निम-गंभीर क्षेत्रांसाठी पाणी व्यवस्थापन योजना तयार करणार.
  • प्रतिबंधित करणे आणि खटला भरणे अशाप्रकारच्या कारवाईची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरणाऱ्यावर कारवाई केली जावी.

‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ :

खडगपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देऊन गौरवांकीत केले गेले आहे. या संस्थेतल्या संशोधकांनी सूर्यप्रकाशात वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांपासून वीज निर्मितीचे तंत्र विकसित करण्यात आले.

त्यांच्या या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोसायटी फॉर रिसर्च अँड इनिशिएटिव्ह्ज फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीज अँड इन्स्टिट्यूशन (SRISTI) या संस्थेच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

‘हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2020’ मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर :

हुरुन रिसर्च या जागतिक संस्थेनी 2020 या वर्षासाठी वार्षिक ‘हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट’ प्रसिद्ध केली आहे.

त्यामध्ये प्रथम क्रमांक 233 युनिकॉर्न स्टार्टअप उद्योगांसह संयुक्त राज्ये अमेरिका देशाने पटकविला.

द्वितीय क्रमांकावर 227 युनिकॉर्नसह चीन, तृतीय क्रमांकावर ब्रिटन तर चौथ्या क्रमांकावर 21 युनिकॉर्नसह भारत आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गूगल क्लासरूम सुरू केले :

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ शिक्षण सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गुगल क्लासरूम उपक्रम सुरू केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे अनावरण केले ज्यायोगे ऑनलाईन शिक्षणासाठी हा प्रकल्प राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले.

या उपक्रमाच्या शुभारंभास मुख्यमंत्र्यांसमवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply