चालू घडामोडी | 06 ऑगस्ट 2020

0

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार :

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

दुरुस्तीच्या प्रस्तावानुसार, उष्णप्रदेशापलीकडील देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचे सर्व 192 सदस्य आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

आसामची स्वतंत्र दूरदर्शन वाहिनी सुरू :

आसाम राज्यासाठी दूरदर्शन आसाम या 24 तास समर्पित वाहिनीचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

ही वाहिनी आसामच्या लोकांसाठी एक भेट असून ही वाहिनी आसाममधल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती खूप लोकप्रिय होईल.

मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल :

जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चे माजी संचालक इब्राहिम अलकाज़ी यांचे 94 व्या वर्षी निधन :

ज्येष्ठ नाट्य कलाकार आणि एक उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या इब्राहिम अलकाजी यांचे 04 ऑगस्ट 2020 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रदीर्घ सेवा देणारे दिग्दर्शक होते. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिक्री आणि पंकज कपूर या कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले. 1950 मध्ये त्यांनी बीबीसी ब्रॉडकास्टिंग अवॉर्डही जिंकला होता.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निलंगेकर हे 1985 ते 86 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here