चालू घडामोडी | 05 ऑगस्ट 2020

संरक्षण मंत्रालयाचे ‘संरक्षण सामग्री उत्पादन व निर्यात विस्तार धोरण 2020’ :

“आत्मनिर्भर भारत मोहीम” याच्या अंतर्गत देशाला संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याला चालना देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. देशाला संरक्षण तसेच अंतराळ विज्ञान क्षेत्रात जगात अव्वल देशांच्या यादीत भारताचे नाव समाविषतः करण्याच्या उद्देशाने, संरक्षण मंत्रालयाने ‘संरक्षण सामग्री व निर्यात विस्तार धोरण 2020’ याची रचना केली आहे.

हे संरक्षण मंत्रालयाचे महत्त्वाचे मार्गदर्शक दस्तऐवज असून त्यायोगे संरक्षण सामुग्री क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आणि निर्यात वाढवणे ही उद्दिष्टे साकार करण्याचे उद्दिष्ट आहे.

धोरणाची उद्दिष्टे

  • 2025 सालापर्यंत एकूण 1 लक्ष 75 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट गाठणे, ज्यात उड्डयन तसेच संरक्षण सामग्री व सेवा क्षेत्राचा वाटा 35,000 कोटी रुपयांचा असणार.
  • सशस्त्र दलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरविण्यासाठी, उड्डयन, नौदलासाठी जहाज बांधणी तसेच संरक्षण क्षेत्रात गतिमानता, मजबूतीकरण व स्पर्धात्मकता आणण्यासाठी संरक्षण उद्योग विकसित करणे.
  • आयात केलेल्या परदेशी मालावर विसंबून न रहाता स्वदेशी संरचना आणि उत्पादने विकसित करीत मेक इन इंडिया मोहिमेचा पुरस्कार करणे. संरक्षण सामुग्री निर्यात करून जगाच्या संरक्षण मूल्य साखळीचा हिस्सा बनणे.
  • संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण तयार करून नवनिर्मितीला पुरस्कृत करणे, भारतीय बौद्धिक संपदेची मालकी तयार करणे तसेच मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण उद्योगाला चालना देणे.

फुटबॉलपटू इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली :

स्पेनला 2010 मध्ये विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू आणि गोलरक्षक इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. कॅसियास पोर्तुगालमधील पोटरे संघाशी 2015 मध्ये करारबद्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तेव्हापासून तो स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेला नाही.

39 वर्षीय कॅसियासने रेयाल माद्रिदकडून पाच वेळा ला-लिगा विजेतेपद पटकावले असून तीन वेळा चॅँपियन्स लीग जिंकली आहे. कॅसियासच्या नेतृत्वाखाली स्पेनने 2010 मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

अत्यावश्यक लसीकरण सेवेची उपलब्धता सुनिश्चित करणारे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क (eVIN) :

देशभरातल्या लसीकरणाचा साखळी पुरवठा मजबूत करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्ककडून (eVIN) अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या अंतर्गत याची अंमलबजावणी केली जाते.

कोविड संक्रमण काळात आवश्यक लसीकरण सेवा सुरू ठेवण्यासाठी तसेच बालकांना आणि गर्भवती मातांना लस प्रतिबंधक रोगापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या सानुकूलनेसह या मजबूत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

eVIN विषयी ठळक बाबी

  • लसींचा साठा आणि प्रवाह, देशभरातल्या सर्व शीत साखळीतल्या साठवणूक तापमानावर वास्तविक वेळेवर माहिती पुरवली जाते.
  • eVIN नेटवर्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे, मजबूत माहिती तंत्रज्ञान संरचना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या माध्यमातून देशभरातल्या विविध ठिकाणी असलेल्या साठा आणि साठवणूक तापमानाचे वास्तविक वेळेवर निरीक्षण केले जाते.
  • eVIN नेटवर्क सध्या 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहचले आहे आणि लवकरच या सेवेचा प्रारंभ अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, लडाख आणि सिक्कीम या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे.
  • सध्या 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 585 जिल्ह्यातले 23,507 शीत साखळी बिंदू eVIN नेटवर्कच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी लस रसद व्यवस्थापन करतात.
  • 41,420 पेक्षा अधिक शीत साखळी हाताळणाऱ्यांना eVIN नेटवर्कने डिजीटल नोंदणीचे प्रशिक्षण दिले आहे.
  • सुमारे 23,900 इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर लॉगर्स लस शीत साखळी उपकरणांमध्ये लस साठ्यांच्या आढाव्यासाठी अचूक तापमानाची नोंद ठेवण्यासाठी बसवण्यात आले आहेत.

Leave a Reply