‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश :
31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.
- 1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
- जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे.
- उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
भारतातला प्रथम “मुस्लीम महिला अधिकार दिन” : 1 ऑगस्ट
भारत सरकारच्या केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतातला प्रथम “मुस्लीम महिला अधिकार दिन” साजरा करण्यात आला.
केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आभासी परिषदेत देशभरातल्या मुस्लीम महिलांशी संवाद साधला.
अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत :
अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.
मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे. अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.
सुनील एस.एस. यांकहा ग्लोबल फेलोशिप अॅवॉर्ड याचा ‘कर्मवीर चक्र पुरस्कार’ देऊन सन्मान :
सुनील एस.एस. यांकहा ग्लोबल फेलोशिप अॅवॉर्ड याचा ‘कर्मवीर चक्र पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ NGO (iCONGO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ या संस्थांच्या वतीने दिला गेला.
“एस.एस. मोटिवेशन” या टेलिग्राम वाहिनीमार्फत दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. “कर्मवीर चक्र पुरस्कार” हा एक जागतिक पुरस्कार आहे जो लोकांना त्यांच्या समाजातल्या योगदानाबद्दल दिला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ या पुरस्कारची स्थापना करण्यात आली आहे.
सामान्य ज्ञान :
- राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) याची स्थापना – एप्रिल 1984.
- भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याची स्थापना – 16 जुलै 1929.
- भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) याची स्थापना – 14 जानेवारी 1965.
- साहित्य अकादमी – स्थापना: 12 मार्च 1954; ठिकाण: नवी दिल्ली.
- आयुध निर्मिती मंडळ (OFB) – स्थापना: वर्ष 1712; मुख्यालय: कोलकाता.
- भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) याची स्थापना – 2 ऑक्टोबर 1958.