चालू घडामोडी | 02 ऑगस्ट 2020

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प :

कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

ठळक बाबी

  • हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.
  • कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.
  • शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.
  • हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के घसरण :

करोना काळात आर्थिक फटका जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना बसत आहे. याला अपवाद अमेरिकेचा देखील नाही. एप्रिल ते जून या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के इतकी घसरण झाली आहे.

ही एक ऐहितासिक घसरण असून आजवरचा घसरणीचा हा विक्रम ठरला आहे. गेल्या तीन महिन्यात अमेरिेकतील बेरोजगारी १४.७ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेतील आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते.

गुरुवारी एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर करण्यात आले. अमेरिकेत १९४७ पासून जीडीपीचे आकडेवारी प्रसिद्ध केले जात आहेत.

१९५८ साली अर्थव्यवस्थेत १० टक्के इतकी घसरण झाली होती. जी सध्याच्या परिस्थितीपेक्षा दुसऱ्या क्रमांकाची मोठी घसरण मानली जाते. या वर्षी जानेवारी- मार्च या तिमाहीत अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी घसरली होती.

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली: संयुक्त राष्ट्रसंघ 

कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

दंगल गर्ल बबिता क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी :

दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे. 2009 आणि 2011च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई करणाऱ्या बबितावर हरयाणा सरकारनं मोठी जबाबदारी टाकली आहे.

Leave a Reply