चालू घडामोडी | 01 ऑगस्ट 2020

हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास :

हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत.

ठळक बाबी

  • वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), भारतीय सुदूर संवेदी संस्था (IIRS) आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.
  • आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करणाऱ्या चातक पक्षीचा मार्गक्रम शोधण्याविषयीचा भारतातला हा पहिलाच अभ्यास आहे. परंपरेनी हिमालयाच्या पायथ्याशी चातक पक्षीचे आगमन ही वर्षाऋतुची चाहूल देते.
  • पावसाळ्याच्या आगमनाच्या वेळेत भारतात दाखल होणारा हा पक्षी ‘वर्षाऋतुचा अग्रदूत’ मानला जातो.

अटल इनोव्हेशन मिशनचा ‘AIM iCREST’ उपक्रम :

30 जुलै 2020 रोजी देशभरातल्या संगोपन परिस्थितीकीय संस्थेमध्ये सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठीच्या उद्देशाने, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याने ‘AIM-iCREST’ उपक्रमाचा प्रारंभ केला.

या कार्यक्रमासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमामध्ये उच्च कार्यक्षमतेच स्टार्टअप उद्योग तयार करण्यासाठी संगोपन परिस्थितीकीय संस्थेची क्षमता वाढ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

अशा प्रकारे नवसंकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाविन्य आणण्यासाठी हा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत आहे.

उपक्रमाचे अपेक्षित परिणाम

  • बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमामध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना अश्या घटकांसाठी कौशल्य आणि मदत मिळू शकणार आहे.
  • नवउद्योजकांना जागतिक स्तरावरचे संगोपन केंद्रांचे जाळे आणि कौशल्य प्रदान करून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित होवू शकणार आहे.
  • याच्या अंतर्गत AIMच्या संगोपन केंद्रांच्या उच्च प्रमाणिकरणानुसार विचार करण्यात येणार आहे आणि हे संगोपन उद्योग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे समर्थन प्रदान करू शकणार आहे.
  • याचा लाभ म्हणजे नवउद्योजकांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.

सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत :

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या १२ जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले आहे. या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरवण्याची जबाबदारी या १२ जणांवर असणार आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.

अपंग क्रीडापटू दीपा मलिकचाही या १२ जणांमध्ये समावेश आहे. एकच निवड समिती क्रीडा पुरस्कार निवडीसाठी ठेवण्याचे गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे. यंदाही तीच पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार या एकाच समितीमार्फत ठरवण्यात येणार आहेत.

माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे निधन :

माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. राम प्रधान १९५२ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले.

तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली.

राज्यात आणि केंद्रात विविध पदे भूषवितानाच संयुक्त राष्ट्रसंघातील जबाबदाऱ्याही पार पाडल्या. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

Leave a Comment