महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. (जनगणना २०११)

मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. कारण महाराष्ट्राला या तीन समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्याविषयी काही महत्वाची माहिती

 • महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960
 • राजधानी मुंबई, राज्यभाषा मराठी.
 • एकुण जिल्हे 36, एकुण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813, पंचायत समित्या 355.
 • एकुण जिल्हापरिषद 34.      
 • विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
 • लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
 • देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या पुणे’ ( 94.3 लाख)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
 • महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
 • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
 • महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
 • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
 • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
 • जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
 • पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (ऑक्टोबर 2016)

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

 • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
 • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
 • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
 • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
 • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
 • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

नैसर्गिक सीमा :

 • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
 • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
 • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
 • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
 • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
 • पश्चिमेस : अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द :

 • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
 • उत्तरेस : मध्यप्रदेश.
 • पूर्वेस : छत्तीसगड.
 • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
 • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

 • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
 • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
 • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
 • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
 • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
 • गोवा : सिंधुदुर्ग

महाराष्ट्राचे भारतातील स्थान :

1) विस्तार

 • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
 • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.

2) आकार

 • व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
 • पाया कोकणात व निमुळते टोक विदर्भात.

3) लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

 • लांबी = पूर्व पश्चिम – 800 किमी.
 • रुंदी = दक्षिण उत्तर – 720 किमी.
 • क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
 • क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
 • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
 • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

जिल्हे निर्मिती :

 • औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला : १ मे १९८१
 • उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला : १६ ऑगस्ट १९८२
 • चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला : २६ ऑगस्ट १९८२
 • बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला : ४ ऑक्टोंबर १९९०
 • अकोला जिल्ह्यातून वाशीम वेगळा केला : १ जुलै १९९८
 • धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला : १ जुलै १९९८
 • परभणी जिल्ह्यातून हिंगोलीची निर्मिती केली : १ मे १९९९
 • भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती केली : १ मे १९९९
 • परभणी जिल्ह्यातून हिंगोली निर्माण केला : १ मे १९९९
 • ठाणे जिल्ह्यातून पालघर ची निर्मिती झाली : १ ऑगस्ट २०१४

नोट : आम्ही या लेखात लवकरच आणखी माहिती अपडेट करू!

3 thoughts on “महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi”

 1. सर/मॅडम,
  ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेला संपूर्ण पालघर जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे तर , ठाणे जिल्ह्याची सीमा दादरा आणि नगर हवेली ला कशी काय लागून आहे ?
  एवढी शंका दूर करावी ही विनंती.

  Reply

Leave a Comment