भारताच्या पंतप्रधानांची यादी व त्यांचा कार्यकाळ – संपूर्ण माहिती

भारताच्या पंतप्रधानांची यादी व त्यांचा कार्यकाळ – संपूर्ण माहिती

भारताचा पंतप्रधान हा भारत देशामधील केंद्रीय सरकारचा प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार आहे. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.

अ.क्र. नाव कार्यकाळ
1. जवाहरलाल नेहरू 1947-1964
2. लालबहादुर शास्त्री 1964-1966
3. इन्दिरा गांधी 1966-1977
4. मोरारजी देसाई 1977-1979
5. चौधरी चरणसिंह 1979-1980
6. इन्दिरा गांधी 1980-1984
7.  राजीव गांधी 1984-1989
8. विश्वनाथ प्रताप सिंह 1989-1990
9. चन्द्रशेखर 1990-1991
10. पी.व्ही. नरसिंम्हा राव 1991-1996
11. अटल बिहारी वाजपेयी 1996 ( FOR 13 DAYS)
12. एच डी देवगौडा 1996-1997
13. इन्द्रकुमार गुजराल 1997-1998
14. अटल बिहारी वाजपेयी 1998-1999 & 1999-2004
15. मनमोहन सिंह 2004-2009 & 2009-2014
16. नरेन्द्र मोदी 2014-2019 & 2019- PRESENT

जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.पंडित नेहरूंना मुले फार आवडत , म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.

 

लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ – ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.

 

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला प्रधानमंत्री व भारतिय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या केंद्रबिंदु सुध्दा होत्या. इंदिरा गांधींनी 1966 ते 1977 व पुन्हा 1980 ते 1984 त त्यांच्या हत्येपर्यंत देशाची सेवा केली. सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर असण्याच्या बाबतीत त्या दुसऱ्या स्थानावर होत्या व प्रधानमंत्री कार्यालय सांभाळणाऱ्या आतापर्यंत त्या एकमेव महिला आहेत.

 

मोरारजी देसाई

मोरारजी रणछोडजी देसाई (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

 

चौधरी चरणसिंह

चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ – २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

 

राजीव गांधी

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ – २१ मे इ.स. १९९१) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले.

 

विश्वनाथ प्रताप सिंग

विश्वनाथ प्रताप सिंह भारताचे आठवे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे शासन एक वर्षाहूनही कमी काळ चालले, २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० पर्यंत. राजीव गांधी सरकार बरखास्त झाल्यामुळे पंतप्रधान बनलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी निवडणुकीच्या माध्यमातून २ डिसेंबर १९८९ रोजी हे पद प्राप्त केले होते.

 

चन्द्रशेखर

चंद्रशेखर सिंह भारताचे नववे पंतप्रधान होते. पंतप्रधान पदावर केवळ ७ महिने राहिलेल्या चंद्रशेखर यांनी ६ मार्च १९९१ ला राजीनामा दिला. परंतु राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. आपल्या संसदेतील भाषणांसाठी ते अतिशय चर्चित होते. १९९५ मध्ये त्यांना आउटस्टैण्डिंग पार्लिमेन्टेरियन पुरस्कार देखील मिळाला होता.

 

पी.व्ही. नरसिंम्हा राव

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (जून २८, इ.स. १९२१ – डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

 

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले.

१९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

 

एच. डी. देवे गौडा

हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा  हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.

 

इंद्रकुमार गुजराल

श्री. इंदरकुमार गुजराल यांनी सोमवार 21 एप्रिल 1997, रोजी भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान पदावर नियुक्ती होण्यापूर्वी 1 जून 1996 पासून त्यांनी परराष्ट्र व्यवहार खात्याचा कारभारही सांभाळला होता, शिवाय जल संपदा मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही त्यांनी सांभाळला. 1989-1990 दरम्यानही ते परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम बघत होते, 1976-1980 दरम्यान ते भारताचे सोविएत रशियातील राजदूत(मंत्रीस्तर) होते व 1967-1976 दरम्यान त्यांनी खालील मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणून काम केले.

 

मनमोहन सिंग

डॉ.मनमोहन सिंह  (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पन्तप्रधान होते. हे १४वे पन्तप्रधान होते. ते कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मन्त्रिमण्डळात केन्द्रीय अर्थमन्त्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानन्तर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.

 

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

Leave a Comment