चालू घडामोडी | 9 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) ९ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. भ्रष्टाचाराविरूध्द लोकांमध्ये जागरुकता पसरविणे हा या दिवसाचा उद्देश आहे. (The theme for 2020 is to be United Against Corruption.)

2) भारतीय हवाई दलाने कृत्रिम तंत्रज्ञानामधली क्षमता दर्शविण्यासाठी ‘स्वार्म ड्रोन’ची चाचणी घेतली.

3) जगात प्रथमच, सिंगापूर देशाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाची विक्री करण्यास मंजूरी दिली आहे. अमेरिकेच्या ‘ईट जस्ट’ या कंपनीने अश्याप्रकाराचे मांस तयार केले आहे.

4) जेहान दारुवाला हा बहरीन देशात ‘साखिर ग्रँड प्रीक्स’ या फॉर्म्युला 2 शर्यतीत जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. ही शर्यत जिंकून त्याने इतिहास रचला आहे.

5) जम्मू व काश्मिर येथील भूखंड वितरित करण्यासंबंधीचा ‘रोशनी अधिनियम-2001’ आहे. हा कायदा औपचारिकपणे ‘जम्मू व काश्मिर राज्य भूमी (व्यापार्‍यांना मालकी हक्क देणे) अधिनियम-2001’ म्हणून ओळखला जातो, कारण जलविद्युत प्रकल्पांसाठी स्त्रोतांची उपलब्धता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला होता.

6) उत्तराखंड राज्याच्या नैनीताल जिल्ह्यातल्या डोंगराळ दुर्गम भागात संस्थात्मक सेवा-सुविधा वितरित करण्यास चालना देण्याच्या उद्देशाने ‘डोली’ सेवा कार्यरत करण्यात आली आहे. महिलांना त्यांच्या प्रसूती काळात तपासणीसाठी ही सेवा आहे.

7) संयुक्त राज्ये अमेरिका देशाच्या संघ न्यायालयाने अनाधिकृत स्थलांतरितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी DACA (डिफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहुड अ‍राईव्हल्स) कार्यक्रमाला चालू ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

8) 8 डिसेंबर 2020 रोजी कतार गुंतवणूक प्राधिकरणाने भारतात गुंतवणूक सुलभ करण्यासाठी भारत आणि कतार यांनी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली.

9) भारतीय वंशाचे राज चौहान हे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताच्या विधानसभेचे सभापती म्हणून निवडले गेले आहेत. या पदावर निवड होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी ठरले आहेत.

‘माऊंट एव्हरेस्ट’ची नवी उंची :

जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी नेपाळकडून जाहीर करण्यात आली. एव्हरेस्टची नवी उंची ही ८,८४८.८६ मीटर असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली.

माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

‘इन्व्हेस्ट इंडिया’ला ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार’ मिळाला :

संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) यांच्यावतीने 2020 या वर्षासाठीचा ‘संयुक्त राष्ट्रसंघ गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार’साठी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या भारतीय उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. जिनेव्हा इथे UNCTAD मुख्यालयी पुरस्काराचे वितरण झाले.

जगातल्या सर्वोत्तम गुंतवणूक संस्थांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार’ देवून गौरविले जाते. गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांच्या क्षेत्रात संयुक्त राष्ट्रांचा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठीत समजला जातो.

1 thought on “चालू घडामोडी | 9 डिसेंबर 2020”

Leave a Comment