वन लायनर चालू घडामोडी
1) डॉ. ए. सिवानथू पिल्लई हे ‘40 इयर्स विथ अब्दुल कलाम – अनटोल्ड स्टोरीज’ या पुस्तकाचे लेखक आहेत.
2) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई या संस्थेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘शहरी जीवनमान गुणवत्ता’ निर्देशांकानुसार चेन्नई शहर स्त्रियांसाठी सर्वात जास्त अनुकूल आणि सुरक्षित आहे. तर पटना शहर सर्वाधिक असुरक्षित आहे.
3) अनिता आनंद या भारतीय वंशाची ब्रिटीश पत्रकार आणि लेखिकेनी ‘पेन हेसेल टिल्टमन प्राइज फॉर हिस्टरी 2020’ हा पुरस्कार जिंकला. तिला ‘द पेशंट अॅससिनः ए ट्रू टेल ऑफ मॅसॅकॅर, रीव्हेंज अँड द राज’ या पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
4) बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात तीन दिवसांचा पहिला ‘स्थलांतरित पक्षी महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला असून त्यासाठी योजना आखली जात आहे. हा कार्यक्रम भागलपूर वन विभाग, मंदार नेचर क्लब आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे.
5) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनुसूचित क्षेत्रीय ग्रामीण बँकांना (RRBs) तरलता व्यवस्थापनासाठी अधिक चांगल्यासाठी आरबीआयच्या लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी (LAF) आणि मार्जिनल स्थायी सुविधा (MSF) मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे.
6) बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या जेहान दारुवाला यानं इतिहास रचला आहे. साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत जेहानं यांनं फार्मुटा टू रेस जिंकली आहे. अशी कामगिरी करारा जेहान पहिला भारतीय ठरला आहे.
भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ :
भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे. आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे.
अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. अनिल सोनी यांच्याकडे १ जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.
आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.
२१ डिसेंबर रोजी गुरू आणि शनी ३९७ वर्षांनंतर जवळ येतील :
गुरू आणि शनी हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे ग्रह, ३९७ वर्षांनंतर आकाशात एकमेकांना स्पर्श करताना बघायला मिळतील. हा योगायोग २१ डिसेंबर रोजी पाहायला मिळेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ घटनेत या दोघांमधील आभासी अंतर केवळ ०.०६ अंश असेल. या दोन्ही चंद्रांना एक डिग्री अंतराने पाहण्याची संधी मिळेल. असा योग नंतर ३७६ वर्षांनंतर येईल. आपण सध्या खुल्या डोळ्यांनी शनी आणि गुरुला आकाशात पाहू शकतो.
शनी चांदीच्या रंगाच्या रिंग्जमध्ये गुंडाळलेला असून त्याचे टायटन आणि रे हे उपग्रहही दिसतील. गुरुचे ४ उपग्रह गायनामिड, कॅलेस्टो, आयओ व युरोपा हेदेखील या वेळी खगाेलप्रेमींना बघायला मिळणार अाहेत.
पहिल्यांदा गॅलिलियो यांनी पाहिली होती ही घटना : महान शास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली यांनी टेलिस्कोप बनवल्यावा १६२३ मध्ये शनी व गुरुला इतक्या जवळून पाहिले होते. दुर्बिणीच्या सुविधेच्या उपलब्धतेमुळे, ग्रह आणि नक्षत्रांसह विश्वाच्या अनेक रहस्यमय व दिशाभूल करणाऱ्या वस्तुस्थितीची सत्यता कळाली. या घटनेची रोचकता आणखीन वाढली आहे कारण ही खगोलशास्त्रीय घटना वर्षाच्या सर्वात छोट्या दिवशी होणार आहे. शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ घटनेला ‘ग्रेट कंजेक्शन’ असे नाव दिले अाहे.
‘आयुष निर्यात संवर्धन परिषद’ची स्थापना करण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एकत्र :
आयुष निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) यांनी मिळून ‘आयुष निर्यात संवर्धन परिषद (AEPC)’ याची स्थापना करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
संकल्पित AEPC आयुष मंत्रालयात स्थापन करण्यात येणार आहे. संपूर्ण आयुष (उत्पादनांच्या) निर्यातीला चालना देवून किंमत आणि दर्जा यांच्या स्पर्धात्मकतेसाठी संपूर्ण आयुष क्षेत्र एकत्रितपणे कार्य करणार आहे. आयुषची उत्पादने आणि सेवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सशी समन्वय साधून काम करणार.
Thx 😊❤️