चालू घडामोडी | 7 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) दरवर्षी देशभर 7 डिसेंबर रोजी सशस्त्र दल ध्वज दिन साजरा करण्यात येतो. 1949 या वर्षापासून सेनादलातील शहिद तसेच देशाच्या सन्मानार्थ सीमेवर लढणाऱ्या पुरुष आणि महिला सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

2) सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला असून त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ घोषित करण्यात आले आहे.

3) जगात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या खार जातींपैकी एक असलेली ‘मलायन जायंट स्क्विरल’ ही जात लवकरच लुप्त पावणार आहे, असे भारतीय प्राणी सर्वेक्षणविभागाने जाहीर केले. भारतात ही जात सिक्किम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मेघालयाच्या काही भागांमध्ये आढळते.

4) नुकत्याच पार पडलेल्या चंद्रयान मोहिमेच्या काळात चीनने चांगए-5 यानाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभूमीवर आपला राष्ट्रीय झेंडा फडकवला आहे. यापूर्वी अमेरिकेनेही 1969 साली अपोलो मोहिमेत आपला झेंडा चंद्रावर फडकवला होता. चीनने 23 नोव्हेंबर रोजी हे यान चंद्रावर पाठविले होते. दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर या यानाने काही नमुने गोळा करून, पृथ्वीच्या दिशेने रवाना झाले आहे.

5) पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीवर आझाद पत्तन जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्याची 700 मेगावॅट क्षमता असणार आहे. हा प्रकल्प चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेचा (CPEC) एक भाग आहे.

6) ब्रिटनमध्ये दूषित वायू प्रदूषणामुळे झालेला जगातला पहिला मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

7) डेफर्ड अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.

कन्हाळगाव अभयारण्य घोषित, दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज  राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात घोषित करण्यात आलेली नवीन दहा संवर्धन राखीव पुढीप्रमाणे आहेत. –

आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग, चंदगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, आजरा-भुदरगड संवर्धन राखीव-कोल्हापूर, गगनबावडा संवर्धन राखीव- कोल्हापूर, पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, जोर जांभळी संवर्धन राखीव-सातारा, मायनी क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील आठ संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता दिली आहे. तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता दिली.

महाराष्ट्र पहिलेच राज्य

एकाच वेळी अभयारण्य व दहा संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे असून कन्हाळगाव हे राज्यातील 50 वे अभयारण्य झाले आहे असे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

बांगलादेशने पहिला व्यापार सहकार्य करारावर (PTA) स्वाक्षरी केली.

बांगलादेशने भूटानबरोबर आपला पहिला व्यापार सहकार्य करार (पीटीए) केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील मर्यादेपर्यंत वस्तूंवर शुल्कमुक्त प्रवेश करता येईल आणि त्याद्वारे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारास चालना मिळेल.

पीटीए (Preferential Trade Agreement) अंतर्गत 100 बांगलादेशी उत्पादनांना भूतानमध्ये ड्युटी फ्री प्रवेश मिळणार आहे, तर भूतानमधील 34 वस्तू बांगलादेशात ड्यूटी फ्री प्रवेश मिळतील.

Leave a Comment