चालू घडामोडी | 6 फेब्रुवारी 2021

वन लायनर चालू घडामोडी

1) तामिळनाडूमधील विल्लुपुरम जिल्हा प्रशासनाने ‘वन्यजीवन संरक्षण अधिनियम-1972’ अन्वये कालिवेली पाणथळ भूमीला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी निवेदन जाहीर केले. ते कालिवेली तलावाच्या ईस्ट कोस्ट रोडवरील मराक्कनम जवळ आहे.

2) बेंगळुरू शहरातल्या येलाहंका एयर फोर्स बेस येथे 03 ते 05 फेब्रुवारी 2021 या कालावधीत “रनवे टू ए बिलियन ऑपर्चुनिटीज” या संकल्पनेखाली जगातले पहिले हायब्रिड (भौतिक तसेच आभासी माध्यमातून भरविलेले) प्रदर्शन ठरणाऱ्या ‘एरो इंडिया 2021’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

3)  ‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’ या संस्थेने ‘2020 डेमॉक्रसी इंडेक्स’ जाहीर केला असून यातील जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक 53 वा लागतो. यादीत नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे. या अहवालात सदोष लोकशाही, संपूर्ण लोकशाही, संकरित शासन आणि सत्तावादी राजवट या श्रेणीमध्ये 167 देशांचे वर्गीकरण केले गेले आहे.

4) ऑक्सफोर्ड लॅंग्वेजेस या संस्थेने ‘आत्मनिर्भरता’ हा शब्द ‘हिंदी वर्ड ऑफ द इयर 2020’ म्हणून घोषित केला.

5) भारत सरकारचे पेयजल व स्वच्छता मंत्रालय ‘गोबरधन / GOBARDHAN’ (गॅल्वनाइझिंग ऑरगॅनिक बायो-अ‍ॅग्रो रिसोर्सेस – धन) या योजनेची अंमलबजावणी करीत आहे आणि ही योजना स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) याचा एक भाग आहे. या योजनेच्या अंतर्गत गुराढोरांचे शेण उपयोगात आणले जाते, ज्यापासून स्वयंपाकाचा वायू, खत यासारख्या विविध उपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते.

6) ‘तेजस’ हे देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ पिढीचे वजनाने हलके लढाऊ विमान आहे. 50 टक्के स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाच्या श्रेणीतले ते पहिले विमान आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत भारताच्या हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या सार्वजनिक कंपनीने तेजस विमान तयार केले आहे. बंगळुरु शहरात हलके लढाऊ विमान (LCA) यांच्या नवीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

7) चंदीगड शहरातल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) या संस्थेत भारतातले पहिले ‘PGI अॅम्पुटी क्लिनिक’ उघडण्यात आले आहे. अॅम्पुटेशन याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे – आघात, शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय आजार यांनी अंग काढून टाकणे, ज्याचा उपयोग प्रभावित अंगातील वेदना किंवा रोगाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो.

8) भारतीय आणि अमेरिकी लष्कराचा संयुक्त सराव ८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत राजस्थानच्या बिकानेरमधील महाजन फील्डमध्ये होईल. दहशतवाद प्रतिबंधावर केंद्रित या सरावात दोन्ही लष्करांचे प्रत्येकी २५० सैनिक सहभागी होतील.

विज्ञानदिनी इस्रोकडून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशात :

यंदाच्या वर्षांतील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो विज्ञान दिनी २८ फेब्रुवारीला ब्राझीलचा अ‍ॅमॅझोनिया १ व भारताचे तीन उपग्रह सोडणार आहे. त्यातील एक उपग्रह हा भारतीय स्टार्टअप कंपनीचा आहे.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक सी ५१ च्या मदतीने चेन्नईपासून १०० कि.मी अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. अ‍ॅमेझोनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो ब्राझीलने तयार केलेला आहे.

आनंद व सतीश धवन तसेच युनिटीसॅट हे उपग्रह समवेत सोडले जाणार आहेत. आनंद हा उपग्रह पिक्सेल या स्टार्टअप म्हणजे नवोद्योगाचा असून सतीश धवन उपग्रह चेन्नईच्या स्पेस किड्झ इंडिया या संस्थेचा आहे.

युनिटीसॅट उपग्रहात तीन उपग्रहांचे मिश्रण असून त्याची रचना जेपीयार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीपेरूम्पदूर, जी.एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग नागपूर, श्री शक्ती इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कोईमतूर यांनी केली आहे.

Leave a Comment