चालू घडामोडी | 6 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) ५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला जातो. [Theme: “together we can through volunteering”.]

2) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सर्व निवासी वसाहतींचे नाव जातीपाती नावे ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजूर केले आहे.

3) ‘कोटक वेल्थ हुरून’ अग्रगण्य श्रीमंत महिला ’अहवालाच्या दुसर्‍या आवृत्तीनुसार, एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

4) 15 वर्षांच्या गीतांजली राव या भारतीय वंशाच्या अमेरिकावासी मुलीला टाइम मासिकाने त्याचा पहिला ‘किड ऑफ द इयर’ सन्मान बहाल केला.

5) प्रक्षेपकाची रचना करण्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधा आणि तांत्रिक कौशल्य यांचा वापर करण्यासाठी अंतराळ विभागाने चेन्नईच्या अग्निकुल कॉसमॉस प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप उद्योगासोबत करार केला.

6) नुकत्याच झालेल्या द्वि-मासिक आढावामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर कायम ठेवला आहे. रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35%ठेवण्यात आला आहे.

7) स्टार इंडियाचे माजी अध्यक्ष आणि वॉल्ट डिस्ने कंपनी फॉर एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष उदय शंकर यांची ‘फिक्की’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

पूर्व हिंद महासागर प्रदेशात रशिया आणि भारत यांच्या नौदलांचा पॅसेज एक्झरसाइज (PASSEX) :

भारतीय नौदलाने 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत पूर्व हिंद महासागर क्षेत्रात रशियाच्या नौदलासोबत ‘पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)’ नामक सराव केला.

ठळक बाबी

  • या सरावात RuFN मार्गदर्शित क्षेपणास्त्र जहाज ‘वर्याग’, मोठे पाणबुडी-भेदी जहाज ‘अॅडमिरल पॅन्टेलेयेव’ आणि मध्यम ओशन टँकर ‘पेचेंग’ या जहाजांचा समावेश होता. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व हेलिकॉप्टरसह स्वदेशी बनावटीची मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट ‘शिवालिक’ आणि ‘कदमत’ हे  पाणबुडीरोधी जहाजाने केले.
  • या सरावाचा उद्देश आंतरपरिचालन वाढवणे, सामंजस्य सुधारणे आणि मैत्रीपूर्ण नौदलांमधील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करणे हा असून उन्नत पृष्ठभाग आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती, शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप कवायती आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. परस्परांच्या बंदरांना भेटीदरम्यान किंवा समुद्रातल्या भेटीच्या वेळी परदेशी मित्रदेशांमधल्या नौदलासोबत भारतीय नौदल नियमितपणे PASSEXचे आयोजन करीत आहे.
  • पूर्व हिंद महासागर प्रदेशात आयोजित केला जाणारा हा सराव दोन्ही देशांमधले दीर्घकालीन सामरिक संबंध आणि विशेषत: सागरी क्षेत्रातले संरक्षण सहकार्य प्रतिबिंबित करतो.

Leave a Comment