चालू घडामोडी | 5 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

2) महाराष्ट्राच्या पुणे शहरात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने “बालकांसाठी मैत्रीपूर्ण” पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले.

3) राष्ट्रकुल वैज्ञानिक व उद्योग संशोधन संघटना (CSIRO) या संस्थेनी ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे पाथफाइंडर (ASKAP) नामक एक रेडिओ दुर्बिण तयार केली आहे. 36 लहान डिश अँटेना मिळून ही दुर्बिण तयार करण्यात आली आहे.

4) हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला ‘C 32 LH 2’ नामक सर्वात मोठी क्रायोजेनिक प्रोपेलेंट टाकी सुपूर्द केली. त्यामुळे GSLV Mk-III प्रक्षेपकाची इंधन वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या 4 टनवरून 6 टन होणार.

5) अयोध्या (उत्तरप्रदेश) या ठिकाणी सरयू नदीवरील ‘रामायण क्रूझ टूर’ सेवा सादर केली जाणार आहे. हा मार्ग घागरा/राष्ट्रीय जलमार्ग-40 यावर असणार आहे.

6) पुण्याजवळच्या उरुळी कांचन गावातल्या “निसर्ग उपचार” आश्रमात 1946 साली महात्मा गांधींनी घेतलेल्या निसर्गोपचार शिबिराच्या स्मरणार्थ राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN, पुणे) याचा नवा परिसर “निसर्ग ग्राम” या नावाने ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत अनेक नव्या कल्पनांवर आधारित निसर्गोपचार अभ्यासक्रमांचा समावेश केला जाणार आहे.

7) उत्तराखंड राज्यात ‘चारधाम’ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम चालू आहे. हा मार्ग बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र ठिकाणांना जोडणार आहे.

8) नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर) हे 2020 या वर्षातले देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे ठरले आहे.

9) कॅनडातून शतकानंतर ‘वाराणसी अन्नपूर्णा’ देवतेची मूर्ती भारतात परत आणली जात आहे. ते अठराव्या शतकातले ‘बनारस शैली’मध्ये कोरलेले शिल्प आहे.

भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी :

भारतीय -अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.

टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.

निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.

Leave a Comment