चालू घडामोडी | 3 डिसेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

2) महाराष्ट्रातील पहिल्याच प्रकारात पुणे शहर पोलिसांनी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात ‘बालस्नेही’ (बाल-मैत्रीपूर्ण) पोलिस स्टेशन सुरू केले.

3) केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील प्रथम स्वदेशी विकसित केलेले 100 ऑक्टन प्रीमियम पेट्रोल लॉन्च केले.

4) वर्षा जोशी यांची ‘राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ’ (NDDB) या संस्थेच्या अंतरिम अध्यक्ष पदावर नेमणूक झाली. गुजरातच्या आनंद येथे मुख्यालयी त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी पदभार सांभाळला. त्यांनी दिलीप रथ यांची जागा घेतली.

5) संदीप कटारिया यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी बाटा कंपनीने त्याच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त केली असून ते या पदावर असणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले.

6) ताज्या ‘यूएस एअर क्वालिटी इंडेक्स’ याच्यानुसार, पाकिस्तानचे लाहोर शहर जगातला सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. द्वितीय क्रमांकावर नवी दिल्ली आहे.

7) हवामान बदलांबाबत चर्चा करण्यासाठी भारत गंभीर असून त्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च स्तरीय आंतर-मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे.

8) ऑस्कर आणि ग्रॅमी-विजेत्या भारतीय संगीतकार ए.आर. रहमान यांना भारतात बाफ्टा ब्रेकथ्रू उपक्रमाचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

9) केंद्राने मिशन कोविड सुरक्षा- भारतीय कोविड -19 लस विकास मिशनसाठी 900 कोटी रुपयांचे तिसरे उत्तेजन पॅकेज जाहीर केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा ‘जागतिक मलेरिया अहवाल 2020’ :

गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘जागतिक मलेरिया अहवाल (WMR) 2020’ जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रसिद्ध केला आहे. भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.

मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 2018 सालाच्या तुलनेत 2019 साली प्रकरणांमध्ये 17.6 टक्के घट झाली. प्रादेशिक स्तरावरील संख्येनुसारही भारतामध्ये या आजाराची रुग्णसंख्या 20 दशलक्ष ते 6 दशलक्ष अशी लक्षणीय रित्या कमी झाली आहे.

मलेरियात दगावण्याच्या प्रमाणात 92 टक्के घट झाली आहे. परिणामी ‘मिलेनियम विकास ध्येये’ मधले सहावे ध्येय (वर्ष 2000 ते वर्ष 2019 या काळात रुग्णसंख्येत 50-75 टक्के घट) साध्य करण्यात यश आले आहे.

पीओकेमध्ये 700 मेगावॅटचा जलउर्जा प्रकल्पाचा करार :

पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये 700 मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरच्या सरकारने चिनी कंपनीबरोबर 1.35 अब्ज डॉलरचा करार केला आहे. हा जल उर्जा प्रकल्प महत्वाकांक्षी चीन पाकिस्तान आर्थिक कोरिडोरचा भाग असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमधील साधानोती जिल्ह्यात झेलम नदीच्या किनाऱ्यावरील आझद पट्टान हायड्रोपॉवर प्रोजेक्‍टमध्ये चायना गेझुबा ग्रुप आणि स्थानिक भागीदार लाराइब ग्रुप पाकिस्तान हे भागधारक आहेत. या विशालकाय प्रकल्पासाठी चायना डेव्हलपमेंट बॅंक, चायना कन्स्ट्रक्‍शन बॅंक, इंडस्ट्रीयल ऍन्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना आणि बॅंक ऑफ चायनाकडून अर्थसहाय्य दिले गेले आहे.

या प्रकल्पाच्या बांधणीचा करार अणि बांधकामासाठी पाणी वापरण्याच्या शुल्काबाबतच्या करारावर “पीओके’चे वीजपुरवठा सचिव जाफर महमूद खान आणि आझाद पट्टन पॉवर प्रा.लि. कंपनीचे मुख्य कर्यकारी अधिकारी ली शियाओला यांनी मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या, असे वृत्त प्रकशित झाले आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर अंतर्गत बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आणि चीनमधील शिन्झियांग प्रांत जोडला जातो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्वाकांक्षी बेल्ट रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांतर्गत “सीपीईसी’ची आखणी केली गेली आहे.

Leave a Comment